Friday, 2 December 2016

गाव स्वच्छ ठेवा, आरोग्यही स्वस्थ राहील गावभेटीत ग्रामस्थांशी पालकमंत्र्यांचा थेट संवाद


  • येनवा विकासासाठी 50 लाख रुपये
  • विजे संबंधी आठ दिवसात तक्रारी सोडवा

नागपूर, दि. 28 : गावातील नागरिकांच्या आरोग्य निरोगी रहावे तसेच संपूर्ण गाव स्वच्छ ठेवण्यासाठी ग्रामस्थांनीच स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. मलेरियासह साथीचे आजार टाळण्यासाठी 24 वेळा गावात औषध फवारणी करा तसेच पिण्याच्या पाण्याची योजनेला अल्ट्रा वॉटर फिल्टर लावा. यासाठी निधी उपलब्ध करुनही देण्यात आलाआहे. येनवा हे संपूर्ण गाव निरोगी ठेवायचे असेल तर स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले.
काटोल तालुक्यातील येनवा या गावात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुक्काम केल्यानंतर सकाळी ग्रामस्थांशी संवाद साधतांना संपूर्ण गावाची पाहणी केली. गावामधील विहिरीमध्ये असलेला कचरा, गावात फेर फटका मारताना रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्याचे ढिग तात्काळ स्वच्छ करण्याच्या सूचना देतांना गावातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पशुवैद्यकीय दवाखान्याचे पाहणी करतांना गावातील पशुंच्या उपचारासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना तसेच औषधोउपचाराची माहिती घेतली.
गावात पिण्याच्या पाण्यासाठी हॅन्डपंपचा वापर करत असतानाच बाजुला असलेल्या कचरा व अस्व्च्छते संदर्भात ग्रामविकास अधिकाऱ्याकडे तिव्र नाराजी व्यक्त करतांना पालकमंत्री चंदशेखर बावनकुळे यांनी हा परिसर कायम स्वच्छ रहावा अशी ताकीत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना थेट निधी उपलब्ध करुन दिला असून हा निधी पिण्याचे पाणी व स्वच्छते साठीच खर्च करा असे सांगतांना पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टार मशीन बसवा व नागरिकांना शुध्द व आरो असलेले पाणी द्या. प्राथमिकआरोग्य केंद्राची स्वच्छता बघुन समाधान व्यक्त करतांना नागरिकांच्या दैनंदिन येणाऱ्या अडचणी वीज ग्राहकांचे प्रश्न या संदर्भातही आढावा घेतला. महावितरणच्या कामासंदर्भात गावकऱ्यांनी व्यक्त केलेली नाराजी तसेच शाखा अभियंता ते लाईनमन मुख्यालयी राहत नसल्याचे आढळून आले आहे. या संदर्भात सक्त कार्यवाहीच्या आदेश देतांनाच येनवा या गावाच्या विकासासाठी 50 लाख रुपयाचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.
शेतकऱ्यांशी संवाद साधतांना कृषी उत्पादन वाढविण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करण्याबाबत बोलतांना पालकमंत्र्यांनी कृषी सहाय्यकांनी गावात राहूनच दररोज पाच शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन मार्गदर्शन करावे, तलाठयांनी गावात राहून ग्रामसचिवांनी 33 रजिस्टर भरुन माहिती अद्यावत ठेवावी, शेतकऱ्यांना सातबारा प्रमाणपत्र शेतकऱ्यांच्या घरी जाऊन द्यावे, असे निर्देशही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
यावेळी आमदार डॉ. आशिष देशमुख, डॉ. राजू पोतदार, किशोर रेवतकर, सभापती संदीन सरोदे, उकेश चव्हाण, दिलीप ठाकरे  व सरपंच श्रीमती ठाकरे उपस्थित होते.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी भेट
काटोल तालुक्यातील जुनापाणी येथील योगेश रामदास पाठे या तरुण शेतकऱ्यांने गुरुवारी आत्महत्या केली. या शेतकऱ्याच्या घरी पालकमंत्र्यांनी भेट देवून त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. या शेतकऱ्याला त्वरित शासकीय मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. पालकमंत्र्यांनी या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना 25 हजार रुपये वैयक्तिक मदत यावेळी जाहीर केली.
तसेच धोतीवाडा येथील दिवाकर धोतरकर या शेतकऱ्यानेही आत्महत्या केली. या शेतकऱ्याच्या घरी जाऊन पालकमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. शासकीय मदतीच्या सूचना देऊन पालकमंत्र्यांनी वैयक्तिक मदतमधून 25 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली.
**********

No comments:

Post a Comment