मुंबई, दि. 27 : प्रसिद्ध गायक मोहम्मद अझीज यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टी समृद्ध करणारा एक लोकप्रिय कलावंत हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, मोहम्मद अझीज यांचे अकाली निधन त्यांच्या चाहत्यांसाठी अतीव दु:खदायी आहे. ८० आणि ९० च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टी समृद्ध करण्यात मोहम्मद अझीझ यांचे मोठे योगदान होते. अनेक चित्रपटांतील त्यांची अवीट गाणी कायम स्मरणात राहणारी आणि तरुणांच्या भावनांना सूर देणारी आहेत. हिंदीसोबत विविध प्रादेशिक भाषांमध्ये त्यांनी केलेले पार्श्वगायन समकालिन पिढीचे सांस्कृतिक भरणपोषण करणारे होते.
००००
No comments:
Post a Comment