Tuesday, 27 November 2018

माजी सैनिकांसाठी रोजगार मेळावा उद्या

नागपूर दि. २७ संचालक पुनर्वसन संरक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडून माजी सैनिकांसाठी रोजगार मेळावा गुरुवार दि. २९ नोव्हेंबर राेजी सकाळी ८ वाजता इन्फ्रंट्री बटालीयन स्पोर्ट ग्राऊंड सिताबर्डी येथे आयोजित करण्यात आला आहे.
 या मेळाव्यामध्ये विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, त्यामध्ये थलसेना, वायूसेना आणि जलसेनेमधून सेवानिवृत्त झालेल्या सर्व माजी सैनिकांनी रोजगार मेळाव्याला उपस्थित राहताना माजी सैनिक ओळखपत्र, पाच फोटो आणि बायोडाटासह प्रत्यक्ष भेट देत संधीचा लाभ घ्यावा. तत्पूर्वी पुनर्वसन संचालनालयाच्या www.dgrindia.com किंवा www.triviz.comसंकेतस्थळावर जावून नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, माजी कॅप्टन दिपक लिमसे यांनी केले आहे.
****

No comments:

Post a Comment