उत्तर
प्रदेशचे नगरविकास मंत्री सुरेश कुमार खन्ना यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई, दि. २
: उत्तर प्रदेशचे संसदीय कामकाज आणि नगर विकास मंत्री सुरेश कुमार खन्ना यांनी आज
सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रयागराज
(अलाहाबाद) येथे होणाऱ्या कुंभमेळ्याचे निमंत्रण दिले.
प्रयागराज
येथे १५ जानेवारी ते ४ मार्च २०१९ यादरम्यान कुंभमेळा होत आहे. यानिमित्त
देशभरातील राज्यांचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांना निमंत्रण देण्यात येत आहे. आज
सकाळी श्री. खन्ना यांनी राजभवन येथे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांना तर दुपारी
सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना निमंत्रण दिले. निमंत्रणाबरोबरच
कुंभमेळ्याचा लोगो, कॉफी टेबल बुक भेट दिले.
३२००
हेक्टर परिसरात होणाऱ्या कुंभमेळ्याच्या ठिकाणी पाणी, वीज, शौचालय, रस्ते, सुरक्षा याविषयीची अत्याधुनिक सोयी सुविधा केल्याची माहिती
श्री. खन्ना यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना दिली. निवास व्यवस्थेमध्ये १५००
लोकांची व्हीव्हीआयपी, चार हजार लक्झरी आणि २०
हजार सामान्य नागरिकांची व्यवस्था केल्याची माहितीही श्री. खन्ना यांनी दिली.
प्रयागराज
याठिकाणी १५ जानेवारी, २१ जानेवारी, ४ फेब्रुवारी, १०
फेब्रुवारी, १९ फेब्रुवारी आणि ४ मार्च यादिवशी शाही स्नानाचे आयोजन करण्यात आल्याचेही श्री. खन्ना यांनी
सांगितले. यावेळी उत्तरप्रदेशचे नगर विकास सचिव संजय कुमार, उपसंचालक विमलेश कुमार उपस्थित होते.
००००



No comments:
Post a Comment