Thursday, 14 March 2019

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ग्राहक कल्याण परिषदेचे अध्यक्ष अरुण देशपांडे

            मुंबईदि. 14 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ग्राहक कल्याण परिषदेचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दिनांक 15 मार्च 2019 रोजी संध्याकाळी 7.30  ते 8 या वेळेत प्रसारित होईल. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
            १५ मार्च हा जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून जगभर पाळला जातो.यानिमित्ताने  घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये १५ मार्च या दिवसाचे महत्व,जाहिरातींच्या माध्यमातून ग्राहकांची होणारी फसवणूक, फसवणूक टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, नवीन ग्राहक कायदा, या कायद्याची वैशिष्टये, दैनंदिन जीवनात ग्राहकांनी जागृती कशी ठेवावी, ग्राहकांनी तक्रार निवारणासाठी कुठे संपर्क साधावा, ऑनलाईन तक्रार नोंदविण्याची सुविधा, ग्राहकांचे हक्क व कायदे आदी विषयांची सविस्तर माहिती श्री. देशपांडे यांनी जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.
००००

No comments:

Post a Comment