Monday, 18 November 2019

खाजगीरित्या 10 वी, 12वीच्या विद्यार्थ्यांना 29 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्जास मुदतवाढ

     
नागपूर, दि. 18:  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 10 वी व 12 वी च्या खाजगीरित्या अर्ज करणाऱ्या (फॉर्म नं. 17) विद्यार्थ्यांना 29 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय सहसचिव व्ही.एच.जोग यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
विद्यार्थी अतिविलंबित शुल्कासह 7 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करु शकतील. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 10 वीच्या विद्यार्थ्यांनी http://from17.mh-ssc.ac.in तर 12 वीसाठी http://from17.mh-hsc.ac.in  या संकेतस्थळावर संपर्क करावा.
ऑनलाईन अर्ज करताना विद्यार्थ्यांनी त्यांची आवश्यक मूळ शैक्षणिक कागदपत्रे सोबत ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी कळविले आहे.
***** 

No comments:

Post a Comment