Monday, 9 October 2017

परवानाधारक मुद्रांक शुल्क विक्रेत्यांच्या संपामुळे बँकासाठी फ्रँकींगची सुविधा

·        जनतेची गैरसोय टाळण्यासाठी उपाययोजना
·        मुद्रांक व नोंदणी फी ई-चलानद्वारे भरा
·        प्रतिज्ञापत्र घोषणापत्रासाठी मुद्रांक शुल्कात माफी
·        शहरातील नऊ बँकेत फ्रँकींगची सुविधा

        नागपूर दि. 9 : राज्यातील परवानाधारक मुद्रांक विक्रेते यांच्या संपामुळे  जनतेची गैरसोय होवू नये यासासाठी जिल्ह्यातील नऊ बँकेत न्यायीकेटर मुद्रांकाची गरज भासल्यास 5 हजार रुपयापर्यंतची  फ्रँकींगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच दस्तावेज नोंदणी करण्याकरिता लागणारे मुद्रांक व नोंदणी फी  ई-चलानद्वारे भरण्याची सुविधा प्रशासनातर्फे उपलब्ध करण्यात आली आहे.
            परवानाधारक मुद्रांक विक्रेते यांच्या संपामुळे जनतेला आवश्यक असलेल्या मुद्रांकाची  गरज फ्रँकींग बँकेत उपलब्ध आहे. तसेच दस्तावेज नोंदणीकरिता लागणारे मुद्रांक व नोंदणी फी  ई-चलान, सिंपल रिसिप्ट, इ. एस. बी. पी. आर. द्वारे भरणा करता येऊ शकतो. हा भरणा ग्रास या वेबसाईटवर सुविधा उपलब्ध आहे. तसेच जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल प्रमाणपत्र, रहिवासाचा दाखला याकरिता लागणाऱ्या प्रतिज्ञापत्र किंवा घोषणापत्राकरिता देय मुद्रांक शुल्कातून माफी देण्यात आली असल्याची माहिती  नागपूर शहराचे मुद्रांक जिल्हाधिकारी  आर. जी. राऊत तसेच नागपूर ग्रामीणचे मुद्रांक जिल्हाधिकारी ए. एस. उगडे यांनी दिली.
न्यायीकेटर 5 हजार रुपयापर्यंतच्या मुद्रांकासाठी  फ्रँकींग सीताबर्डी  व गांधीबाग येथे अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची शाखा, वर्धमाननगर येथील उमीया अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, सिव्हिल लाईन्स येथील युनियन बँक ऑफ इंडिया, सीताबर्डी येथील आयडीबीडीआय बँक, सी. ए. रोडवरील वर्धमान अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक व नंदनवन येथील निर्मल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत ही सुविधा उपलब्ध आहे.
*****

No comments:

Post a Comment