Saturday, 21 April 2018

जनतेला कालमर्यादेत सेवा उपलब्ध करुन द्या -अश्वीन मुदगल




नागरी सेवा दिनाचे आयोजन
                                * उकृष्ठ सेवेबदल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव
               
        नागपूर, दि. 21 : माहिती तंत्रज्ञानाच्या प्रशासनामध्ये प्रभावी वापर होत असताना प्रशासकाची जबाबदारी सुध्दा बदलत आहे. या बदलत्या परिस्थीतीत जनतेनला पारदर्शक, प्रभावी तसेच कालमर्यादेत सेवा देण्याचा प्रयत्न करा असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आज नागरी सेवा दिनाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते.
             कार्यक्रमाला निवासी जिल्हाधिकारी रविंद्र खजानजी, अधिक्षक प्रदीप कापसे, जे.बी. पोहणकर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
            नागरी सेवा दिन साजरा करण्याताना जनतेच्या उपेक्षेनुरुप सेवा देण्याचे प्रशासनाची जबाबदारी असल्याचे सांगाताना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले की,  प्रशासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपण जनतेचे सेवक आहो ही भावना ठेवून काम करावे. तसेच आजचे तंत्रज्ञान खूप जलद असल्याने त्याप्रमाणे तत्पर राहून काम करावे लागते . शासनाच्या प्रत्येक योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यत पोहचविण्याची जबाबदारी फार मोठी असते तसेच अनेक बाबती सजग राहून प्रशासकीय अधिकाऱ्यांला काम करावे लागते तसेच दर्जेदार सुविधा जनतेला मिळाव्यात यासाठी अनेक बदल करण्यात येत असेही ते यावेळी म्हणाले. 
            मार्गदर्शन करताना रविंद्र खजानजी म्हणाले, स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशांनी नागरी सेवेचा वापर आपल्या कामासाठी करवून घेतला. परंतु स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना नवीन जबाबदारी देण्यात आल्यानंतर त्यांना शासन व्यवस्थेनुसार कार्य करावे लागले. जनतेचा सोईसाठी आपल्याला नेमण्यात आले यांची जाणीव प्रशासकीय अधिकाऱ्यांना करुन देण्यात आली. परंतु आजची तरुण पिढीने कठोर परीक्षम करुन जनतेच्या सेवेसाठी प्रशासकीय सेवेत मोठया प्रमाणात यावे असेही ते यावेळी म्हणाले.
            नागरी दिना निमित्त प्रशासनात उकृष्ठ काम केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी,  उमरेड येथील उपविभागीय अधिकारी जे.पी. लोंढे, कळमेश्वरच्या तहसिलदार श्रीमती हंसा मोहणे, कामठीच्या नायब तहसिलदार सुनील तरुडकर, लघुलेखक संजय गिरी, अमित हाडके, राघवेंद्र भुषणवार, अभिषेक हिवसे, अजय खेाब्रागडे, राजेश उमाटे, दीपक मांढरे, नेत्रदिप डोये यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन श्रीमती डॉ. मंजूषा सावरकर यांनी केले तर आभार श्रीमती सपना काळे यांनी मानले.
****

No comments:

Post a Comment