Tuesday, 26 June 2018

वानाडोंगरी व पारशिवणी नगर परिषदेच्या निवडणूकीसाठी आचार संहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकारी अश्विन मुदगल


        नागपूर, दि.26 : वानाडोंगरी व नगर पंचायत पारशिवणी येथिल 15 जुलै रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पूर्व तयारीसाठी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आज आढावा बैठक घेतली. 
            या निवडणूकीत आचार संहितेची प्रभावी अंमलबजावणी व खर्चावर नियंत्रण ठेवणे व आर्थिक बळाचा दुरुपयोग टाळणे या बाबतीत जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी पूर्व सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्यात.   या बैठकीत निवडणूक संनियंत्रण समितीच्या कार्यकक्षेबाबत चर्चा करण्यात आली. संवेदनशील भागासाठी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवार व राजकीय पक्षानी खर्चाबाबतची माहिती वेळेत सादर करावी आर्थिक व्यवहारावर तसेच हालचालीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना पोलिस विभागाला देण्यात आल्या.
            निवडणूक पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी मतदानांवर प्रभाव टाकणाऱ्या तसेच मद्य व पैसे इत्यादीं गोष्टीवर अंकुश ठेवण्याचा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
            निवडणूक कालावधीत पेड न्यूज, पेड सोशल कमेटी, सोशल मिडिया, इंटरनेट इत्यादींवर लक्ष ठेवणे तसेच यावर उपयायोजना करण्याकरीता व्हिडीओग्राफी सर्व्हेलियन्स पथक, भरारी पथक तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्या.
            बैठकीला पोलिस उपायुक्त एम.डी.राऊत, विक्रीकर उपायुक्त अंजली खांडवे, राज्यउत्पादन शुल्कचे अधिक्षक श्वेता काकडे, प्रभारी नगरपालिका प्रशासनाचे ज्ञानेश्वर भट, पारशिवणी नगरपालिकेचे राम जोशी उपस्थित होते.
*****

No comments:

Post a Comment