* राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची कारवाई
नागपूर, दि. 07 : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नागपूर येथील विभागीय भरारी पथकाद्वारे यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरातून पाच लाख रूपये किमतीचा 1 हजार सिलबंद देशी दारुचा अवैध साठा जप्त करण्यात आला.
बुधवार, दिनांक 5 सप्टेंबर रोजी विभागीय भरारी पथकाद्वारे यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात गस्त घालण्यात आली. गस्तीदरम्यान मेघदूत कॉलनी परिसरात अवैध मद्य साठ्याची वाहतुक व पुरवठा केला जात असल्याची माहिती पथकास प्राप्त झाली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय उप आयुक्त श्रीमती उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक दत्तात्रय जानराव, उपनिरीक्षक विशाल कोल्हे यांनी चमूसह छापा मारला. कारवाई दरम्यान चारचाकी वाहन क्र. एम.एच. 34, एबी 6438 या गाडीतून नेण्यात येणाऱ्या 180 मिली क्षमतेच्या देशी दारुच्या 20 सिलबंद पेट्या 90 मिली क्षमतेच्या 10 सिलबंद पेट्या असून त्यांची किंमत 5 लक्ष 920 रुपये आहे. कारवाई दरम्यान अज्ञात इसम फरार झाल्याने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्याचे कलम 65(ए) (ई), 81, 83 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईमध्ये उपनिरीक्षक एम. के. मते, जवान प्रकाश मानकर, राहुल सपकाळ, गजानन वाकोडे, विनोद डुंबरे, प्रशांत घावळे सहभागी होते. पुढील तपास उपनिरीक्षक विशाल कोल्हे करीत आहेत.
*****
No comments:
Post a Comment