नागपूर, दि. 7 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नागपूर विभागीय कार्यालय, विभागीय माहिती केंद्र व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या वतीने राजाराम सीताराम दीक्षित वाचनालय, सीताबर्डी, नागपूर येथे दि. 11 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 11.30 वा दुर्मिळ ‘लोकराज्य’ मासिकाच्या अंकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.हे प्रदर्शन सकाळी 11.30 ते दुपारी 4.30 दरम्यान वाचकांना पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे.
या प्रदर्शनामध्ये 1964 पासूनचे विविध विशेषांक पाहण्यासाठी उपलब्ध असतील. यामध्ये प्रामुख्याने बालगंधर्व विशेषांक, शाहू महाराज यांच्या राज्यरोहण सोहळा शताब्दीनिमित्त प्रकाशित विशेषांक, धम्मचक्र प्रवर्तन महोत्सव विशेषांक, ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी (नोव्हेंबर 1990), महात्मा गांधी, सानेगुरुजी, यशवंतराव चव्हाण, पंजाबराव देशमुख, स्वातंत्र्य दिन, अखिल भारतीय साहित्य संम्मेलन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विशेषांक, निवडणूक, शेती, सिंचन, बेटी बचाव संदर्भातील विशेषांक, शिक्षण, वन, पर्यटन यासह विविध विषयांना वाहिलेले विशेषांकही आहेत. दुर्मिळ ‘लोकराज्य’ मासिक अंकांच्या प्रदर्शनाचा लाभ वाचकांनी घेण्याचे आवाहन विभागीय माहिती केंद्राचे जिल्हा माहिती अधिकारी केशव करंदीकर यांनी केले आहे.
-----000-
No comments:
Post a Comment