Tuesday, 11 February 2025

'एआय’ क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या 'स्टार्टअप्स'ना सर्वतोपरी सहकार्य -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 



‘सायबर हॅक-2025’ या स्पर्धेचे बक्षीस वितरण

 नागपूर, दि. 9 : सायबर क्राईमचे जग वेगाने बदलत आहे. सायबर  गुन्हेगाराकडून एआयचा वापर करून सामान्य माणसाला भुरळ घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे सायबर युद्ध रोखायचे असल्यास तंत्रज्ञानानेच सक्षमपणे उत्तर देण्याची गरज आहे. भविष्याचा वेध घेत एआय क्षेत्रात स्टार्टअप निर्मितीची गरज आहे. एआय क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप्सना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ परिसरात ‘सायबर हॅक-2025' या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, सहपोलीस आयुक्त निसार तांबोळी, सायबर सेक्युरिटी एक्सपर्ट अमित दुबे आदी उपस्थित होते.

 देशभरात विविध प्रकारचे सायबर फसवणुकीचे प्रकार सुरू आहेत. येत्या काळात  विशेषतः सायबर क्राईमवर लक्ष द्यावे लागणार आहे. महाराष्ट्राने सायबर प्लॅटफॅार्म तयार केला आहे. केंद्र शासनानेही या प्लॅटफॅार्मचे कौतुक केले आहे. महाराष्ट्र हे स्टार्टअप कॅपिटल असल्याचे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात दिसून आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

                                                                                                      

सायबर हॅक हा नागपूर शहर पोलिसांचा सायबर गुन्हेगारी आणि सायबर सुरक्षा यासंबंधीच्या आगामी आव्हानांवर उपाय शोधण्यासाठीचा एक आगळावेगळा उपक्रम होता. सायबर गुन्ह्यांशी संबंधित  समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा पाच विषयांवर 6 जानेवारी 2025 रोजी सुरु झाली. पहिल्या टप्प्यात (ऑनलाइन फेरी) आयोजित करण्यात आली. या पहिल्या फेरीत देशभरातून 600 संघांनी भाग घेतला आणि सायबर तंत्रज्ञानाशी संबंधित आपल्या समस्या सोडविण्याचे उपाय सादर केले. या 600 संघांमधून 20 संघांची अंतिम फेरीसाठी (ऑफलाइन फेरी) निवड करण्यात आली. अंतिम फेरी 7 आणि 8 जानेवारी 2025 दरम्यान आयआयएम नागपूर येथे आयोजित करण्यात आली. या स्पर्धेतील रामदेवबाबा महाविद्यालय (प्रथम), इन्फोसिस कॅार्पोरेट (द्वितीय) तर रायसोनी महाविद्यालय (तृतीय) या विजेत्या संघांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

 

0000



‘विदर्भ ग्लोबल स्किल युनिव्हर्सिटी’साठी 100 एकर जागा देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस




* पर्यटनावर आधारित परिषदेचे आयोजन व्हावे

* खासदार औद्योगिक महोत्सवाचा समारोप

 

नागपूर,दि. 9 –विदर्भात विविध उद्योग समूह आकारास येत आहेत या उद्योग समूहांना आवश्यक असलेले तंत्र कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात लागणार आहे भविष्यातील रोजगाराची ही संधी लक्षात घेता स्थानिक युवकांना विविध कौशल्य देणाऱ्या विद्यापीठाची आवश्यकता होती यासाठी साकारणाऱ्या विदर्भ ग्लोबल स्किल युनिव्हर्सिटी साठी शंभर एकर जागा उपलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

असोसिएशन फॉर इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंटच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात सुरू असलेल्या तीन दिवसीय समारोप समारंभात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रफुल पटेल, आ. चित्रा वाघ, आ. चरणसिंग ठाकूर, आ. चैनसुख संचेती, माजी खासदार विकास महात्मे, माजी खासदार अजय संचेती, उद्योग सचिव पी. अनबलगन,  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे संचालक मनोज सूर्यवंशी, आयआयएमचे संचालक डॉ. भीमराया मैत्री आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

खासदार औद्योगिक महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी एआयडीचे कौतुक करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सामंजस्य करारातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची अपेक्षा व्यक्त केली. आज विदर्भाच्या प्रत्येक क्षेत्राचा विकास होत असून त्या क्षेत्रांना व्यासपीठ देण्याचे काम या महोत्सवात झाल्याचे ते म्हणाले. याशिवाय विदर्भाचा समग्र विकास हा उद्देश असून यासाठी नागपूर आणि अमरावती हे  मॅग्नेट क्षेत्र तयार करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले. यामुळे नजीकच्या भागांचा विकास होईल. आगामी काळात पर्यटन आधारित परिषदेचे आयोजन व्हावे, असेही ते म्हणाले.

प्रकल्पांमधून साडे सात लाख कोटींची गुंतवणूक – नितीन गडकरी

अत्यंत यशस्वी अश्या खासदार औद्योगिक महोत्सवाच्या दुसऱ्या आवृत्ती मधून विविध प्रकल्पांमधून साडे सात लाख कोटींची गुंतवणूक विदर्भात होत आहे. याशिवाय गडचिरोली जिल्ह्यात  जगात सर्वात उत्तम दर्जाचे लोहखनिज असून यामुळे नजीकच्या जिल्ह्यात मोठमोठे उद्योग सुरु होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नागपूरच्या एमआरओमध्ये बोईंगचे काम सुरू असून नागपूर एव्हिएशन हब होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.  

                                                                                                            

प्लग अँड प्ले औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर राहील – पीयुष गोयल

विदर्भात नागपूर -बुटीबोरी दरम्यान स्कील युनिव्हर्सिटी तयार करण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्री श्री. गडकरींनी दिल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. या अर्थसंकल्पात देशात १०० प्लग अँड प्ले औद्योगिक क्षेत्र तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यात महाराष्ट्र आघाडीवर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एआयडी अध्यक्ष आशीष काळे यांनी केले. आयोजन समिती अध्यक्ष अजय संचेती, खासदार प्रफुल पटेल यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. प्रारंभी खासदार औद्योगिक महोत्सवावर आधारित माहितीपट दाखविण्यात आला. तत्पूर्वी विदर्भातील सुवर्णकार यांनी फडणवीस यांचा सत्कार केला महोत्सवाला सुमारे १ लाख २५ हजार नागरिकांनी भेट दिली.

सामंजस्य करार:

आर्टिफिशियल इलेक्ट्रॉनिक्स इंटेलिजंट मटेरियल लिमिटेड हे नागपुरात इलेक्ट्रॉनिक सेमीकंडक्टर क्षेत्रात नागपुरात १० हजार कोटींची गुंतवणूक करणार असून ५०० रोजगार निर्मिती होणार आहे. राज्य शासनाकडून उद्योग सचिव पी. अनबलगन यांनी हा करार केला. श्रेम ग्रुप ऑफ कंपनीज बायोइंधन क्षेत्रात विदर्भात ८०० कोटींची गुंतवणूक करणार असून त्यातुन १०० रोजगार निर्माण होणार आहे.  राज्य शासनाकडून उद्योग सचिव पी. अनबलगन यांनी हा करार केला. ओलेक्ट्रा इव्हीचे चेयरमन के. व्ही. प्रदीप यांनी नागपुरातील आगामी गुंतवणुकीबद्दल माहिती दिली. हा सामंजस्य करार दावोस मध्ये झाला होता.

 

****

   

 


कर्मचारी हाच एमआयडीसीचा कणा

                    -  उद्योग मंत्री उदय सामंत

 

नागपूर, दि. 9 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील कार्यरत असलेल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या मुलांनाही भविष्यात आपल्या उद्योगाची पायाभरणी करता आली पाहिजे. विविध उद्योग व्यवसायांना सकारून देण्याचे कसब अंगी असलेल्या आमच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना हे बाळकडू घरूनच असल्याने ते यात कमी पडणार नाहीत. यादृष्टीने विचार करून गुणवत्ताधारक पाल्यांना आयपॅड व इतर साहित्य देऊन प्रोत्साहन देण्याची भूमिका उद्योग विभागाने घेतली असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.

नियोजन भवन येथील सभागृहात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील अधिकारी कर्मचारी यांच्या आठवी ते दहावीपर्यंत शिकत असलेल्या गुणवत्ताधारक पाल्यांना टॅब व शैक्षणिक आज्ञावलीच्या वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. 

कोणत्याही चांगल्या गोष्टीचे श्रेय जेव्हा विभाग प्रमुख म्हणून, या विभागाचे मंत्री म्हणून आम्ही घेतो तेव्हा नकळत या यशामागे या विभागातील कर्मचाऱ्यांचेही हात व मेहनत आहे, याची जाणीव उद्योग मंत्री म्हणून मी प्रत्येक वेळेस ठेवली आहे. या जाणिवेतूनच आपल्या आरोग्य विमाबाबत, आपल्याला लागणाऱ्या सेफ्टी साहित्य  याचबरोबर दुचाकी वाहनासाठी पूर्वी असलेली मर्यादा वाढवून देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

अलीकडच्या वर्षात महाराष्ट्राच्या उद्योग विभागाने महत्वपूर्ण निर्णय घेऊन यासाठी लागणारी कामे अतिशय अल्प कालावधीत पूर्ण करून दाखवले. अमरावती येथील टेक्स्टाईल पार्क साठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन हे केवळ 45 दिवसात आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी करून दाखवले याचा आम्हाला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी नागपूर व अमरावती विभागातील 51 पाल्यांना टॅब देण्यात आले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपेंद्र तामोरे, मुख्य राजेश झंजाड, अधीक्षक अभियंता सुनील अकुलवार, प्रादेशिक अधिकारी मनोहर पोटे व मान्यवर उपस्थित होते.

00000



                                          क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेतून दैनंदिन ताणतणाव दूर होऊन सांघिक भावना वाढीस

                                                                    - अपर आदिवासी आयुक्त रवींद्र ठाकरे

 लेखा व कोषागारे विभागाच्या राज्यस्तरीय कला व क्रीडा स्पर्धेचा समारोप

 

नागपूर, दि. 9 : शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी नियमितपणे विविध क्रीडा स्पर्धा झाल्या पाहिजेत. अशा स्पर्धांच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचाऱ्यांत सांघिक भावना निर्माण होते. स्पर्धाच्या आयोजनातून अधिकारी-कर्मचाऱ्यांचा दैनंदिन प्रशासकीय कामाचा तणाव दूर सारल्या जाऊन नवचैतन्याने लोकाभिमुख प्रशासन राबविण्यास सहाय्य होत असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी आज येथे केले.

लेखा व कोषागारे संचालनालय तसेच स्थानिक निधी लेखापरीक्षा कर्मचारी कल्याण समिती यांच्या वतीने तीन दिवसीय राज्यस्तरीय कला व क्रीडा स्पर्धेचे आयोजन विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या मैदानावर करण्यात आले होते.  त्यावेळी ते बोलत होते. समारोपप्रसंगी लेखा व कोषागार संचालक दिपाली देशपांडे, स्थानिक निधी लेखा परीक्षा मुंबईचे संचालक निलेश राजुरकर, संचालक वनामती सुवर्णा पांडे, नागपूर येथील लेखा व कोषागार विभागाच्या सहसंचालक ज्योती भोंडे,  स्थानिक निधी लेखापरीक्षा नागपूर येथील सहसंचालक गौरी ठाकूर, यांच्यासह लेखा व कोषागार विभागाचे राज्यभरातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शरीराला स्वस्थ आणि निरोगी ठेवण्यासाठी खेळ खेळणे आवश्यक आहे. सर्वांनी विविध माध्यमातून आपले छंद पूर्ण करावे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. त्यासोबत मनालादेखील निरोगी करण्यामध्ये खेळाची खूप मोठी भूमिका असते. सांस्कृतिक स्पर्धांच्या माध्यमातून सहभागाचे एक मोठे व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे श्री. ठाकरे यावेळी म्हणाले. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत विविध कला व क्रीडा स्पर्धांमध्ये राज्यभरातील लेखा व कोषागारे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

 

स्पर्धानिहाय विजेते

 राज्यस्तरीय कला व क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या कलावंत व खेळाडूंना त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी पारितोषिक देण्यात आले. त्यामध्ये सांस्कृतिक स्पर्धेत गायन क्षेत्रात सहभाग घेणाऱ्या महिला (एकल) श्रृती वेपेकर ह्या विजेता तर पुनम कदम ह्या उपविजेता ठरल्या. तसेच पुरूष (एकल) सुमेध खानवीस हे विजेता तर सतीश पारधी उपविजेता ठरले. युगल गायनामध्ये सुमेध कांबळे व संध्या ढोणे ही जोडी विजेता आणि अर्चना पुरणिक व अंकूश नलावडे ही जोडी उपविजेता ठरली. समुह नृत्यमध्ये कोकण विभाग विजेता तर अमरावती विभाग उपविजेता ठरला. सुत्रसंचालनामध्ये स्वरांजली पिंगळे व अक्षय कडळक ही जोडी विजेता तर अश्विनी कुलकर्णी व अनय संघरक्षित ही जोडी उपविजेता ठरली. कार्यक्रमाच्या दिग्दर्शनासाठी अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई या विभागाला विजेता घोषित करण्यात आले तर कोकण भवन हा उपविजेता ठरला. रांगोळी स्पर्धा एकलमध्ये यामिनी खरड या विजेता ठरल्या तर नम्रता चव्हाण ह्या उपविजेता ठरल्या. युगलमध्ये अरविंद जाधव, सीमा सावंत,  नितिश कदम,  सुषमा देशमुख, प्रिया सुर्याजी हे विजेता तर भाग्यश्री बरांगे, वैशाली गंगावणे, रेखा मोहीते, संध्या हाते, स्वाती तारे हे उपविजेता ठरले.

                                                                                                                                                .2.

 

.2.

 क्रीडा स्पर्धांमध्ये संदिप बाबर हे 200 मीटर धावणे या स्पर्धेत प्रथम तर निलेश जाधव यांना द्वितीय व शिवाजी पांढरे यांना तृतीय पारितोषीक मिळाले. महिलांमध्ये कलावती गिऱ्हे यांनी प्रथम पारितोषीक पटकावले तसेच  विश्रांती पाटील या द्वितीय व दिपाली थोरात या तृतीया स्थानी राहील्या. लांब उडी पुरुषांमध्ये अर्जुन सिरसाट हे प्रथम तर राहुल भोयर यांनी द्वितीय व संकेत दिवटे यांनी तृतीय स्थान पटकावले. महिलांमध्ये विश्रांती पाटील (प्रथम), दिपाली थोरात (द्वितीय) व  प्रियंका हरड (तृतीय). थाळीफेक मध्ये महिला  रिंकल माळवी (प्रथम), नयना सोलव (द्वितीय) व  प्राजक्ता वाकोडे (तृतीय). पुरुषांमध्ये  प्रविण बोरकर (प्रथम), विनोद काळे (द्वितीय), पलाश कोहळे (तृतीय). गोळाफेक मध्ये महिला सोनू राठोड (प्रथम),  कल्पिता शेंडी (द्वितीय), रूपाली भोसले (तृतीय). पुरुषांमध्ये अनिल राऊत (प्रथम), निलेश लाड (द्वितीय), विनोद काळे (तृतीय). पाच कि.मी चालणे यास्पर्धेत पुरुषांमध्ये  मंदार जोशी (प्रथम), संदिप अहिरे (द्वितीय),  बळीराम पाटील (तृतीय). तीन कि.मी चालणे या स्पर्धेत महिलांमध्ये वर्षा मानकर (प्रथम),  शिल्पा सहारे (द्वितीय), राजश्री मेहेर (तृतीय). 50 मी. पोहणे (फ्री स्टाईल) यामध्ये जयदेव देशपांडे (प्रथम), संतोश पाटील (द्वितीय), अरविंद वाघमोडे (तृतीय). 100 मी पोहणे (फ्री स्टाईल) यामध्ये. जयदेव देशपांडे (प्रथम), अमोल कवडे (द्वितीय), संतोष पाटील (तृतीय). कॅरम या स्पर्धेत महिलांमध्ये भाग्यश्री देशपांडे (विजेता) व पूजा होतकर (उपविजेता) ठरल्या. याच स्पर्धेत महिला युगलसाठी  वैशाली सोनवाने व कविता देशपांडे (विजेता),  श्रीमती मनस्वी काळे व श्रीमती क्षितीजा काळे (उपविजेता) ठरल्या. याच स्पर्धेत पुरूषांमध्ये श्री शैलेंद्र भोसले विजेता तर श्री हुकुमचंद बोरूडे उपविजेता ठरले. युगल पुरूषांमध्ये श्री प्रविण पवार व श्री संदिप सावंत हे विजेता तर श्री रोहित मस्के व प्रशांत मते हे उपविजेता ठरले. टेबल टेनिस या स्पर्धेत महिलांमध्ये (सिंगल) श्रीमती चैताली जाधव विजेता तर श्रीमती दिप्ती देशमुख उपविजेता ठरल्या. युगल महिलांमध्ये श्रीमती दिप्ती देशमुख व श्रीमती संध्या मनवर विजेता तर श्रीमती चैताली जाधव व श्रीमती योगिता पवार उपविजेता ठरल्या. याच स्पर्धेत पुरूषांमध्ये (सिंगल) श्री प्रितम रामटेक विजेता तर श्री शेखर सुतार उपविजेता ठरले तसेच युगल पुरूषांमध्ये श्री प्रितम रामटेक व प्रशांत सावंत विजेता आणि श्री निलेश बारकुर व श्री सर्फराज हे दोघे उपविजेता ठरले. बॅटमिंटन स्पर्धेत महिला (सिंगल) मध्ये श्रीमती दिशा ताकतोडे ह्या विजेता ठरल्या तर श्रीमती ज्योती गायकवाड ह्या उपविजेता राहिल्या. युगल महिलांमध्ये श्रीमती दिशा ताकतोडे व श्रीमती सुलोचना चव्हाण या दोघी विजेता तर श्रीमती स्वराली पिंगळे व श्रीमती ज्योती गायकवाड उपविजेता ठरल्या. याच स्पर्धेत पुरुषांमध्ये मयंत केळकर विजेता तर संतोष चाळके उपविजेता ठरले तसेच युगल पुरूषांमध्ये मयंक केळकर, योगेश कुमावत ही जोडी विजेता तर मंगेश चहारे व साधनकर ही जोडी उपविजेता ठरली. बुध्दिबळ या स्पर्धेत मंदार पाटील हे विजेता तर किशोर माढास हे उपविजेता ठरले. थ्रो बॉलमध्ये  महिला शिल्पा वाकडे उत्कृष्ट खेळाडू तर नागपूर विभाग विजेता संघ ठरला तसेच पुणे विभाग उपविजेता संघ ठरला. शुटींग बॉलमध्ये आबासाहेब घायाळ हे उत्कृष्ट खेळाडू, छत्रपती संभाजी नगर हा संघ विजेता तसेच कोकण विभाग उपविजेता ठरला. खोखो खेळामध्ये संघमित्रा कांबळे हा खेळाडू उत्कृष्ठ ठरला. तर अधिदान व लेखा कार्यालय विजेता ठरले तसेच पुणे विभाग उपविजेता ठरला. क्रिकेट स्पर्धेत कोकण विभाग विजेता ठरला.

0000