* पर्यटनावर आधारित परिषदेचे आयोजन व्हावे
* खासदार औद्योगिक महोत्सवाचा
समारोप
नागपूर,दि. 9 –विदर्भात विविध उद्योग समूह आकारास येत आहेत या उद्योग समूहांना आवश्यक
असलेले तंत्र कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात लागणार आहे भविष्यातील रोजगाराची ही
संधी लक्षात घेता स्थानिक युवकांना विविध कौशल्य देणाऱ्या विद्यापीठाची आवश्यकता
होती यासाठी साकारणाऱ्या विदर्भ ग्लोबल स्किल युनिव्हर्सिटी साठी शंभर एकर जागा
उपलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
असोसिएशन फॉर इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंटच्या वतीने राष्ट्रसंत
तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात सुरू असलेल्या तीन दिवसीय समारोप
समारंभात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रफुल पटेल, आ. चित्रा वाघ, आ. चरणसिंग
ठाकूर, आ. चैनसुख संचेती, माजी खासदार विकास महात्मे, माजी खासदार अजय संचेती,
उद्योग सचिव पी. अनबलगन, महाराष्ट्र
पर्यटन विकास महामंडळाचे संचालक मनोज सूर्यवंशी, आयआयएमचे संचालक डॉ. भीमराया
मैत्री आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
खासदार औद्योगिक महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी
एआयडीचे कौतुक करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सामंजस्य करारातून मोठ्या प्रमाणात
रोजगार निर्मितीची अपेक्षा व्यक्त केली. आज विदर्भाच्या प्रत्येक क्षेत्राचा विकास
होत असून त्या क्षेत्रांना व्यासपीठ देण्याचे काम या महोत्सवात झाल्याचे ते
म्हणाले. याशिवाय विदर्भाचा समग्र विकास हा उद्देश असून यासाठी नागपूर आणि अमरावती
हे मॅग्नेट क्षेत्र तयार करण्याचे प्रयत्न
सुरु असल्याचे ते म्हणाले. यामुळे नजीकच्या भागांचा विकास होईल. आगामी काळात
पर्यटन आधारित परिषदेचे आयोजन व्हावे, असेही ते म्हणाले.
प्रकल्पांमधून
साडे सात लाख कोटींची गुंतवणूक – नितीन गडकरी
अत्यंत यशस्वी अश्या खासदार औद्योगिक महोत्सवाच्या
दुसऱ्या आवृत्ती मधून विविध प्रकल्पांमधून साडे सात लाख कोटींची गुंतवणूक विदर्भात
होत आहे. याशिवाय गडचिरोली जिल्ह्यात जगात
सर्वात उत्तम दर्जाचे लोहखनिज असून यामुळे नजीकच्या जिल्ह्यात मोठमोठे उद्योग सुरु
होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नागपूरच्या एमआरओमध्ये बोईंगचे काम सुरू
असून नागपूर एव्हिएशन हब होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
प्लग अँड प्ले
औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर राहील – पीयुष गोयल
विदर्भात नागपूर -बुटीबोरी दरम्यान स्कील
युनिव्हर्सिटी तयार करण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्री श्री. गडकरींनी दिल्याबद्दल
त्यांनी कौतुक केले. या अर्थसंकल्पात देशात १०० प्लग अँड प्ले औद्योगिक क्षेत्र
तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यात महाराष्ट्र आघाडीवर राहील, असा विश्वास
त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एआयडी अध्यक्ष आशीष काळे
यांनी केले. आयोजन समिती अध्यक्ष अजय संचेती, खासदार प्रफुल पटेल यांनीही यावेळी
विचार व्यक्त केले. प्रारंभी खासदार औद्योगिक महोत्सवावर आधारित माहितीपट
दाखविण्यात आला. तत्पूर्वी विदर्भातील सुवर्णकार यांनी फडणवीस यांचा सत्कार केला
महोत्सवाला सुमारे १ लाख २५ हजार नागरिकांनी भेट दिली.
सामंजस्य करार:
आर्टिफिशियल इलेक्ट्रॉनिक्स इंटेलिजंट मटेरियल लिमिटेड
हे नागपुरात इलेक्ट्रॉनिक सेमीकंडक्टर क्षेत्रात नागपुरात १० हजार कोटींची
गुंतवणूक करणार असून ५०० रोजगार निर्मिती होणार आहे. राज्य शासनाकडून उद्योग सचिव
पी. अनबलगन यांनी हा करार केला. श्रेम ग्रुप ऑफ कंपनीज बायोइंधन क्षेत्रात
विदर्भात ८०० कोटींची गुंतवणूक करणार असून त्यातुन १०० रोजगार निर्माण होणार
आहे. राज्य शासनाकडून उद्योग सचिव पी.
अनबलगन यांनी हा करार केला. ओलेक्ट्रा इव्हीचे चेयरमन के. व्ही. प्रदीप यांनी
नागपुरातील आगामी गुंतवणुकीबद्दल माहिती दिली. हा सामंजस्य करार दावोस मध्ये झाला
होता.
****
No comments:
Post a Comment