महिला
सक्षमीकरण सप्ताह म्हणून
महाराजस्व
अभियान राबविणार
-
विभागीय आयुक्त
नागपूर, दि.30 : येत्या 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महाराजस्व अभियान
हे महिला सक्षमीकरण सप्ताह म्हणून राबविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय
आयुक्त अनूप कुमार यांनी दिली.
यावर्षीचे
महसूल अभियान हे महिला सक्षमीकरण म्हणून राबविण्यात येणार असून “ताई,
मावशी, आक्का आता जग जिंका” असे घोषवाक्य असून या सप्ताहभरात जिल्हा, तालुका व गावपातळीवर
विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.
आज
सकाळी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन
त्याचे नियोजन तयार करण्यात आले आहे.
1 ऑगस्ट
या महसूल दिन दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात येथे
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना
निमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या 23 अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र
देऊन गौरवण्यात येणार आहे. त्यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी,
उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायबतहसिलदार, मंडळ अधिकारी, लघुलेखक, अव्वल कारकून,
लिपीक-नि-टंकलेखक, तलाठी, शिपाई, कोतवाल व पोलीस पाटील यांचा समावेश आहे.
महिला
सक्षमीकरण सप्ताह राबविण्यासाठी खालील बाबींवर विशेष भर देण्यात येणार आहे.
लक्ष्मी-मुक्ती
योजनेअंतर्गत 7/12 उताऱ्यावर पुरुषाबरोबर स्त्रियांच्या मालकीहक्कांची नोंद
करणेसाठी विशेष मोहिम राबविणे, वारस नोंदी करतांना कुटुंबातील महिला वारसदारांची
नावे वगळली गेली असल्यास तर नव्याने वारस नोंद घेणे, तसेच महिला खातेदारांच्या
अधिकार अभिलेख विषयीचे अर्जावर प्राधान्याने कार्यवाही करणे, महिला खातेदारांच्या
वहिवाट किंवा पांधण रस्त्यांसंदर्भात असलेल्या तक्रारीवर प्राधान्याने कार्यवाही
करणे, महिला बचत गटांना कर्जपुरवठा करण्यास विशेष मोहिम राबविणे, रोजगार हमी
योजनेतील महिला जाबकार्ड धारकांना विशेष मेळावे घेवून मार्गदर्शन करणे,
शिधापत्रिकेवर कुटूंब प्रमुख म्हणून महिलांची नोंदणी करणे, मतदार यादीमध्ये 18
वर्षे पूर्ण झालेल्या मुली व मतदार नोंदणी न झालेल्या महिलांच्या नोंदणीसाठी विशेष
मोहिम राबविणे, महिला खातेदारांचा अधिकार अभिलेख विषयीचे अर्जावर प्राधान्याने
कार्यवाही करणे, वन जमीनीचे पट्टे वाटप करणे, उज्ज्वला योजना अंतर्गत गॅस कनेक्शन
देणे, महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजीत करणे व विविध योजनांची माहिती देणे,
महिलांना आधार कार्ड / निवडणूक ओळखपत्र देणे, ग्रामपंचायत मधील नमुना 8-अ मध्ये
पतीच्या नांवासोबत महिलांच्या नावाची नोंद करणे, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील
विधवेच्या नावाने ॲटोरिक्षा परवाना देणे, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना
शिलाई मशीन वाटप.
00000000
No comments:
Post a Comment