नागपूर दि. 20 : जम्मू कश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये रविवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांशी कडवी झुंज देतांना विदर्भाचे दोन जवान शहीद झाले. यात यवतमाळ जिल्ह्यातील पुरळ गावाचे विकास जनार्दन कुळमेथे व अमरावती जिल्ह्यातील नांदगाव येथील विकास उर्फ पंजाब जानराव उईके यांचे पार्थिव आज वायूसेनेच्या विमानाने सोनेगाव विमानतळावर आणण्यात आले. विमान तळावर कर्नल बलबीर सिंह व एअर कमांडर अलोक शर्मा, विंग कमांडर डी. के. पांडे, ग्रुप कमांडर जी. एल. नागेंद्र यांनी शहीद जवानांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
जिल्हा प्रशासनातर्फे आमदार. अनिल सोले, सुधाकर कोहळे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जिल्हा सैनिक कार्यालयाचे अधिकारी कॅप्टर दीपक लिमये यांनी पुष्पचक्र अर्पण करुन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
19 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास शहीद विकास कुळमेथे यांचे पार्थिव विमानाने नागपूर विमानतळावर आणण्यात आले विमानतळावर कर्नल बलबीर सिंह यांनी पार्थिव सन्मानाने राष्ट्रध्वजात ठेवून त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. त्यानंतर शहीद विकास कुळमेथे यांचा पार्थिव सैन्यदलाच्या वाहनाने कामठी येथील गार्ड रेजिमेंट सेंन्टर येथील सैन्यदलाच्या रुग्णालयात ठेवण्यात आला. आज सकाळी 6.30 वाजता शहीद विकास कुळमेथे यांचे पार्थिवावर कामठी येथील गार्ड रेजिमेंट सेंन्टर येथे कर्नल बलबीर सिंह व प्रहार समाज जागृती संस्थांच्या वतीने निवृत्त कर्नल सुनील देशपांडे व फ्लाईंग ऑफिसर श्रीमती शिवाली देशपांडे यांनी पुष्पचक्र अर्पण करुन भावपूर्ण श्रद्धांजल वाहिली. त्यानंतर पार्थिव सोनेगांव विमातळावर मिलटरी वाहनाने आणण्यात आले. कर्नल बलवीर सिंह, नायब सुभेदार जय लाल, जवान चंदन राम, अरविंद यादव, महेंद्र सिंह, विनोदकुमार, हनुमान यादव, उगले मुगले विष्णू अर्जुन, डी. श्रीकांत यांनी शहीद जवानांना गार्ड ऑफ ऑन दिले. त्यानंतर शहीद जवानांचे पार्थिव वायूसेनेच्या हेलिकॉप्टरने अमरावतीकडे नेण्यात आले.
*****
No comments:
Post a Comment