- टाईम्स ऑफ इंडियाच्या नागपूर टाईम्स नवीन अवतरणात
नागपूर, दि.9 : न्याय व्यवस्था आणि प्रिंट मीडियाची आजही समाजात विश्वासहार्यता असून इतर माध्यमांपेक्षा प्रिंट मीडियाचे महत्व आजही अबाधित असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
हॉटेल तुली इंपीरियल येथे टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राच्या नागपूर टाईम्सच्या नवीन अवतरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर टाईम्स ऑफ इंडियाचे राजकीय संपादक प्रफुल्ल मारपकवार, तसेच सहायक कार्यकारी संपादक दरेग डिसूजा, संचालक पराग रस्तोगी, निवासी संपादक सुनील वारियर होते.
यावेळी महापौर प्रवीण दटके, आमदार प्रकाश गजभीये, वीज वितरण कंपनीचे संचालक श्याम वर्धने, विभागीय आयुक्त अनूप कुमार, पोलिस आयुक्त पी. व्यंकटेश्वर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे आदी उपस्थित होते.
विविध माध्यमामध्ये स्पर्धा निर्माण होत असतांना प्रिंट माध्यमाबद्दल विश्वासहार्यता कायम असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे प्रभावी असले तरी यामाध्यमावरील बातमी परत घेता येते. परंतू प्रिंट मीडियामध्ये परत घेता येत नाही. टाईम्स ऑफ इंडिया हे संपूर्ण वृत्तपत्र असून नागपूर मधून टाईम्स ऑफ इंडिया प्रसिद्ध होतो ही नागपूरसाठी गौरवाची बाब आहे. नागपूरच्या विकासात टाईम्स वृत्तपत्राचे मोठे महत्व असल्याचे त्यांनी सांगितले.
शहर व विभागाच्या विविध प्रश्नांसंदर्भात टाईम्सने महत्वाची भूमिका घेतली असून नागनदी संवर्धनाच्या प्रकल्पामध्ये सहभागी होतो. तसेच स्वत:ला नागपूरकर म्हणून घेण्याचा मला अभिमान आहे. असे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले अब्दुल कलाम यांनी नॅशनल मिशनसाठी वृत्तपत्राचे महत्व अधोरेखीत केले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या नागपूर टाईम्स या नवीन अवतरणाला शुभेच्छा दिल्यात. तसेच पहिल्या अंकाचे प्रकाशन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी संपादक सुनील वारियर यांनी तर आभार सुनील शांडिल्य यांनी मानले.
******
No comments:
Post a Comment