नागपूर दि. 12 : राजमाता जिजाऊ मा साहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आले.
येथील विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी राजमाता जिजाऊ मा साहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी अप्पर आयुक्त अरूण उन्हाळे, जात पडताळणी समितीचे अध्यक्ष मनोजकुमार सूर्यवंशी, महसूल उपायुक्त जितेंद्र पापळकर, उपायुक्त श्रीकांत फडके, सहआयुक्त सुधाकर कुळमेथे, तहसीलदार श्रीराम मुंदडा, प्रशांत पाटील, सहसंचालक भाग्यश्री जाधव, नाझर प्रमोद जोंधुळकर यांच्यासह विभागीय आयुक्त कार्यालयातील विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment