नागपूर, दि. 25 : महाराष्ट्र मिनी गोल्फ संघटना व जिल्हा क्रीडा परिषदेतर्फे 62 व्या राष्ट्रीय शालेय मिनी गोल्फ स्पर्धांचे आयोजन येत्या 2 ते 5 फेब्रुवारी या कालावधीत विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आले असून या स्पर्धांचे यशस्वी आयोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शालेय मिनी गोल्फ स्पर्धांच्या आयोजना संदर्भात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना श्री. कुर्वे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र मिनी गोल्फ संघटनेचे डॉ. सूरजसिंह येवतीकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
62 वी राष्ट्रीय शालेय मिनी गोल्फ 19 वर्ष मुले व मुली यांचे स्पर्धा दिनांक 2 ते 5 फेब्रुवारी 2017 पर्यंत आयोजित करण्यात येणार असून या स्पर्धांमध्ये 12 राज्यांचा सहभाग राहणार आहे. स्पर्धांसाठी 288 खेळाडू, 20 पंच, 24 मार्गदर्शक, तसेच 12 व्यवस्थापक उपस्थित राहणार आहे. खेळाडू व इतर मान्यवरांची निवास व्यवस्था तसेच खेळाचे मैदान यामध्ये अठरा होल असलेले मिनी चेअर कोर्ट तयार करण्यात येणार आहेत. या स्पर्धांसाठी जिल्हा क्रीडा परिषदेतर्फे सहकार्य करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी यावेळी सांगितले.
0000000
No comments:
Post a Comment