मुंबई, दि.30 : वन विभागाने संरक्षण कुंपण बांधण्यासाठी कोणतेही निकृष्ट साहित्य वापरले नसल्याचे वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानपरिषदेत सांगितले.
अमरावती जिल्ह्यातील वडाळी येथे संरक्षण कुंपण बांधण्यासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्यासंदर्भातला प्रश्न सदस्य प्रा.जोगेंद्र कवाडे, राहुल नार्वेकर यांनी विचारला.
या प्रश्नाला उत्तर देताना श्री.मुनगंटीवार यावेळी म्हणाले की, वन विभागाने कोणतेही निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरलेले नाही. संरक्षण भिंत बांधण्यासाठी एकूण 40 पिलर वापरण्यात आले, त्यापैकी 2 पिलर हे क्षतिग्रस्त झाले. या संरक्षण भिंतीसाठी आलेला खर्च वन विभागाकडून करण्यात आलेला आहे. वनजमिनीवर अतिक्रमण रोखणे, वनांसाठीची जागा निश्चीत करणे यासाठी वन विभागाकडून संरक्षित भिंत घालण्यात येते. ज्या वनक्षेत्राचे सीमांकन करण्यात आले आहे, ते वनक्षेत्र नागरी भागात असल्याने अतिक्रमण होऊ नये यासाठी सीमांकन करण्यात आले आहे.
००००
No comments:
Post a Comment