- बाधित क्षेत्रासाठी 43 कोटीचे नियोजन
- घरपोच राशन अभिनव उपक्रम
- खान बाधित क्षेत्रातमध्ये निधीचे विवरण
- लोकप्रतिनिधीचा विश्वासात घेऊन आराखडा
नागपूर दि. 22 : खनिज बाधित क्षेत्राचा विकास करतांना पर्यावरण आरोग्य, शिक्षण आदी सामाजिक व आर्थिक विकासाला सहाय्यक होणाऱ्या योजनाचा समावेश करतांना संबंधित लोकप्रतिनिधीना विश्वासात घेऊन प्रस्ताव तयार करा अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्यात.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा खनिज प्रतिष्ठान ची बैठक पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षते खाली आयोजित करण्यात आली होती. त्या प्रसंगी मागदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. मल्लीकार्जुन रेड्ढी ,सुधीर पारवे,समीर मेघे,जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, ग्रीन व्हीजन संस्थेचे कौस्तुभ चॅटर्जी खाणपट्टा धारकांचे प्रतिनिधी एस.एम. बोरीकर, के.एस. बोरीकर,के.एस. दिवे,एम.डी. मांगले, जिल्हा खनिकर्म अधिकारी एस.पी.कडू, आदी उपस्थित होते.
खाण व खनिजे विकास व नियम अधिनियमा अंतर्गत जिल्हात जिल्हा खनिज प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली असून प्रमुख व गौण खनिज पट्टाधारकाकडून स्वामित्व निधी म्हणून 43 कोटी रुपयाचा निधी गोळा झाला आहे. या निधी पैकी खाण बाधित क्षेत्रासाठी 28 कोटी 66 लक्ष रुपयांचे व ईतर क्षेत्रासाठी 14 कोटी 34 लक्ष रुपये विविध विकास कामांवर खर्च करण्यात येणार आहेत. 60 टक्के निधी पिण्याचे पाणी पर्यावरण आरोग्य शिक्षण, कौशल्य विकास आदी नऊ बाबिंवर करावयाचा संपूर्ण संबंधित आमदारांनी दिलेल्या प्रस्तावाप्रमाणे प्रत्येक बाधित क्षेत्रानुसार निधी व विकास कामांचे नियोजन करुन प्रस्ताव 30 एप्रिल पर्यंत सादर करावे अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्यात.
खाण क्षेत्रात विकास कामे प्रस्तावित करतांना ज्या ग्रामपंयाचती पिण्याच्या पाण्याचे विद्युत देयक भरण्यास सक्षम नाही, अशा ठिकाणी सोलर पंप बलाविणे,आरोग्य केद्रांना सोलर द्वारा वीज पुरवठा, शालेय विद्यार्थ्थांना पोषण आहारामध्ये अंडी व दूध पुरविणे तसेच या भागातील नागरिकांना घरपोच राशन पुरवठा करणे. पर्यावरण शिक्षण आरोग्य सुविधा. डिजीटल शाळा, आदी प्रस्ताव प्राधान्याने तयार करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी बैठकीत दिल्यात.
खनिज प्रतिष्ठाण निधी मधील प्रस्थावित केलेल्यसा कामांना उच्चाधिकार समिती कडून मान्यता मिळाल्या नंतर योग्य कामांचे नियोजन कर तसेच प्रत्येक तीन महिन्यात कामांचा आढावा घेऊन फलश्रृती नोंदवा अशा सूचनाही या वेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यानी दिल्यात.
प्रारंभी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी स्वागत करून जिल्हा खनिज प्रतिष्ठाण मध्ये 43 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध असून उमरेड, रामटेक,हिंगणा आदी खाण क्षेत्रातील विकास योजनांसाठी 475 प्रस्ताव सादर झाले आहेत. यापैकी बाधित क्षेत्रातील 218अप्रत्यक्ष बाधित क्षेत्रातील 256 प्रस्तावांचा समावेश आहे.
आभार प्रदर्शन जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री. कडू यांनी मानले.
000000
No comments:
Post a Comment