Thursday, 27 July 2017

सौर कृषीपंप योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी अटी शिथिल - चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. 27 : सौर कृषी पंप योजनेंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी अटी शिथिल करण्यात आल्या असून ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे क्षेत्र दहा एकर आहे त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेचा फायदा घेऊन ज्या विहिरींवर सौर पंप दिला आहे तेथे सौर कृषी पंप लागल्यानंतर दहा वर्षांनंतर मागणी केल्यास महावितरण मार्फत विद्युत पुरवठाही देण्यात येईल, अशी ग्वाही ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.
 श्री. बावनकुळे पुढे म्हणाले, सदर प्रकल्प पायलटस्तरावर राळेगण सिध्दी येथे यशस्वी झाल्यावर त्यासाठी येणारा अत्यल्प खर्च बघता ही योजना राज्यभर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या शासनाकडे सहा हजार 511 सौर कृषीपंप उपलब्ध आहेत. कोकणातील शेतकऱ्यांनी मागणी केल्यास त्यांना सौर कृषीपंप उपलब्ध करुन दिले जातील.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य सर्वश्री बाळाराम पाटील, भाई जगताप आदींनी प्रश्न उपस्थित केला होता.
००००

No comments:

Post a Comment