मुंबई, दि. २९:उच्च व
तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज राज्यपाल आणि कुलपती सी. विद्यासागर राव
यांची राजभवन येथे भेट घेतली. मुंबई विद्यापीठाचे निकाल आणि परीक्षांच्या पेपर
तपासणी संदर्भात श्री. तावडे आणि राज्यपाल यांच्यामध्ये सुमारे अर्धातास सविस्तर
चर्चा झाली.
विधीमंडळामधील दोन्ही सभागृहातील सदस्यांनी
विद्यापीठाच्या निकालासंदर्भात ज्या भावना व्यक्त केल्या होत्या, त्या श्री.
तावडे यांनी राज्यपालांच्या कानावर घातल्या. सध्या सुरु असलेल्या पेपर तपासणीच्या
सद्यस्थितीची माहिती श्री. तावडे यांनी राज्यपालांना दिली. विद्यापीठांच्या
परीक्षांच्या सर्व उत्तरपत्रिका दिलेल्या मुदतीत तपासून होतील आणि बहुतांश
परीक्षांचे निकाल ३१ जुलैपर्यंत
लागतील, असेही श्री. तावडे यांनी सांगितले.
000
No comments:
Post a Comment