मुंबई, दि. ३१ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ या विषयावर सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांची मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होणार आहे. ही मुलाखत शुक्रवार दि. १ सप्टेंबररोजी संध्याकाळी ७.३० ते ८ या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदिका शिबानी जोशी यांनी घेतली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची अंमलबजावणी, या योजनेंतर्गत कर्जमाफी व इतर प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी शेतकरी कुटुंब हा निकष विचारात घेण्यात आला आहे. या योजनेसंदर्भातील शासन निर्णयाची संपूर्ण माहिती, या कर्जमाफीचे निकष काय आहेत, या योजनेसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. १५ सप्टेंबर असून शेतक-यांनी विहित मुदतीत अर्ज भरावेत, या आवाहनांसह इतर विषयांवर सविस्तर माहिती श्री. देशमुख यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून दिली आहे.
0000
No comments:
Post a Comment