Friday, 1 September 2017

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे 
यांचा रविवारी जनता दरबार

जनतेच्या गाऱ्हाणी ऐकणार
                                             
        नागपूर, दि.1 :  पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जनता दरबार रविवार, दिनांक 3 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता रविभवन येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी पालकमंत्री जनतेशी थेट संवाद साधून त्यांचे प्रश्न समजावून घेणार आहेत.
            जतना दरबारला सन 2004 पासून सुरुवात केली आहे. शहर आणि ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटून आपल्या समस्या मांडतात. त्यानंतर प्रत्येक निवेदनाची दखल घेवून त्यावर निर्णय घेण्यात येतो. तसेच समस्यांवर त्या खात्याकडून आलेल्या उत्तराची प्रत निवेदनकर्ता व्यक्तीपर्यंत पोहचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
            जनता दरबारात विविध प्रश्न, समस्या, ग्रामपंचायत संबंधित प्रश्न असो किंवा ग्राहक पंचायतीची वा व्यावसायिकांची समस्या ऐकून त्यानुसार कार्यवाही होणार ही बाब सर्वसामान्यांना सुखावून जाते. रविवार, दिनांक 3 सप्टेंबर 2017 रोजी रविभवन येथे होणाऱ्या जनता दरबारात नागरिकांनी आपले प्रश्न घेवून सहभागी व्हावे.
000000000

No comments:

Post a Comment