Monday, 4 September 2017

महाराष्ट्रातील 25 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार


नवी दिल्ली4 : महाराष्ट्रातील 25 शिक्षकांना उद्या राष्ट्रीय शिक्षक दिन 5 सप्टेंबर 2017 रोजी उपराष्ट्रपती  एम. वेंकैया नायडू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे .
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने शिक्षक दिनानिमित्त येथील विज्ञान भवनात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2016-17 वितरणाचे आयोजन करण्यात आले आहे. उपराष्ट्रपतींच्या हस्ते  आणि केंद्रीय मंत्री तथा वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
 महाराष्ट्रातील एकूण 25 शिक्षकांची निवड राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार-2016-17’ साठी झाली आहे. यात एकूण 17 प्राथमिक शिक्षक असून यापैकी 2 शिक्षक हे विशेष श्रेणीचे आहेत. 8 माध्यमिक शिक्षकांना सन्मानीत करण्यात येणार असून 1 शिक्षक हे विशेष श्रेणीचे आहेत.
या 17 प्राथमिक शिक्षकांना गौरविण्यात येणार
नागोराव तायडेमहानगर पालिका उच्च प्राथमिक मराठी शाळा क्र.2घाटकोपर(प.) (मुंबई)उज्ज्वला नांदखिलेजिल्हा परीषद प्राथमिक शाळासाडेसतरा नळीता.हवेली (पुणे)शोभा मानेजिल्हा परीषद प्राथमिक शाळाचिंचणीता. तासगांव(सांगली)तृप्ती हतिसकरमहानगर पालिका प्राथमिक शाळाप्रभादेवी (मुंबई)सुरेश शिंगणेजिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळापिंपळगांव चिलमखापो. उंबरखेडता. देऊळगांव राजा(बुलडाणा)संजिव बागुल,जिल्हा परीषद प्राथमिक शाळासांभवेपो. माळे  ता.मुळशी (पुणे)राजेशकुमार फाटे ए.टी.जिल्हा परीषद प्राथमिक शाळाडोंगरगांवपंचायत समिती लाखनी (भंडारा)ज्योती बेलावळे,जिल्हा परीषद प्राथमिक शाळाकेवनीदिवेपो. काल्हेरता. भिवंडी (ठाणे)अर्जुन ताकटेजिल्हा परीषद प्राथमिक शाळा,अहेरगांव,  ता. निफाड(नाशिक)रुख्मिणी कोळेकरजिल्हा परीषद प्राथमिक शाळावांगी-2ता. करमाळा (सोलापूर)रामकिशन सुरवसेजिल्हा परीषद प्राथमिक शाळानागोबावाडीता.औसा(लातूर),प्रदीप शिंदेजिल्हा परीषद प्राथमिक शाळाशिलापूरता.जि.(नाशिक),अमीन चव्हाणजिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळानिंभापो. देऊरवाडाता.दिग्रस (यवतमाळ)उर्मीला भोसलेजिल्हा परीषद प्राथमिक शाळा,महालदारपुरीता.वाशी (उस्मानाबाद)गोपाल सुर्यवंशी ,जिल्हा परीषद प्राथमिक शाळागंजुरवाडीता.जि.(लातूर) या शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.          
प्राथमिक शिक्षकांच्या विशेष श्रेणी अंतर्गत अर्चना दळवीजिल्हा परीषद प्राथमिक शाळाबाहुली,ता.हवेली (पुणे)सुरेश धारवजिल्हा परिषद प्राथमिक शाळा निफाड क्र.2 ता. निफाड(नाशिक) यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. उपरोक्त पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षक हे सहायक शिक्षक आहेत.
9 माध्यमिक शिक्षकांना गौरविण्यात येणार
 माध्यमिक शाळांच्या शिक्षकांमध्ये तीन मुख्याध्यापक व सहा सहायक शिक्षकांना सन्मानीत करण्यात  येणार आहे. या शिक्षकांमध्ये नंदा राऊतमोतीलाल कोठारी विद्यालयकडाता.आष्टी(बीड),स्मीता करंदीकरअहिल्यादेवी मुलींची उच्च माध्यमिक शाळाहोळकरवाडाशनिवार पेठपुणे(पुणे),नंदकुमार सागर(मुख्याध्यापक)जिजामाता उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय,जेजुरीता. पुरंदर(पुणे)शर्मीला पाटीलअं‍बिका विद्यालयकेडगांवता.जि.(अहमदनगर)सुनील पंडीत (मुख्याध्यापक),प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयनवीपेठ,अहमदनगर (अहमदनगर)कमलाकर राऊत,योगेश्वरी नुतन विद्यालयपरळी रोडअंबाजोगाई(बीड),संजय नारलवार(मुख्याध्यापक)प्रियंका उच्च माध्यमिक शाळाकानेरीता. जि. (गडचिरोली) यांचा समावेश आहे.        
माध्यमिक शिक्षकांच्या विशेष श्रेणी अंतर्गत डॉ. मिनल सांगोळे मुक-बधिर शाळाउत्तर अंबाझरी रोड,शंकरनगर नागपूर, (नागपूर)  यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
पदकप्रमाणपत्र आणि  50 हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
००००

No comments:

Post a Comment