Friday, 1 September 2017

'आपले जिल्हे - विकासाची केंद्रे' : लोकराज्य विशेषांक प्रकाशित



मुंबई 01 : राज्य शासनाने गेल्या तीन वर्षांमध्ये जिल्ह्यांमध्ये राबविलेल्या योजना व निर्णयांचा आढावा घेणारा सप्टेंबर महिन्याचा लोकराज्य 'आपले जिल्हे - विकासाची केंद्रेहा विशेषांक नुकताच प्रकाशित झाला आहे. हा अंक सर्वत्र बूक स्टॉलवर उपलब्ध आहे.
या अंकात प्रत्येक जिल्ह्यात राबविलेल्या ‍जलयुक्त शिवार योजनाआपले सरकारस्वच्छता अभियान,वृक्षलागवड मोहीमस्मार्ट सिटी योजनामुख्यमंत्री ग्राम सडक योजनामेट्रो प्रकल्पआरोग्य योजनाडिजिटल महाराष्ट्रविविध महामार्गछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आदींच्या अंमलबजावणीची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे.
काही जिल्हे विकासाचेनाविन्यपूर्ण योजनांचे आदर्श पॅटर्न म्हणून समोर येत आहेत. पालकमंत्री व प्रशासनामुळे विकासकामे सूत्रबद्धरित्या राबविली जात आहेत.
आपल्या जिल्ह्यात कोणकोणती विकासकामे राबवली याचा सविस्तर वृत्तांत वाचकांना या अंकाच्या माध्यमातून वाचायला मिळेल. 76 पृष्ठांच्या या विशेषांकाची किंमत 10 रूपये आहे.
००००

No comments:

Post a Comment