Monday, 4 September 2017

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत

               मुंबई, दि. ४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात संकल्प स्वच्छतेचा-स्वच्छ महाराष्ट्राचा' या विषयावर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून दि. ६ आणि ७ सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी  ७.२५  ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे.
         राज्यात दिनांक २२ ऑगस्ट ते २ ऑक्टोंबर २०१७ या कालावधीत 'संकल्प स्वच्छतेचा - स्वच्छ महाराष्ट्राचाहे अभियान राबविण्यात येत आहेया अभियानाचा उद्देशअभियानाचे वेगळेपणलोकप्रतिनिधीअधिकारी आणि लोकांचा या अभियानात मिळत असलेला सहभागगाव ते राज्यस्तरापर्यंत स्वच्छतेच्या उपक्रमात असलेला कामाचा उत्साह अभियानाला मिळत असलेले अभुतपूर्व यश आणि शासन करत असलेला प्रयत्न या सर्व विषयावर सविस्तर माहिती श्री. लोणीकर यांनी 'दिलखुलासकार्यक्रमातून दिली आहे. ही मुलाखत निवेदक संजय भुस्कूटे यांनी घेतली आहे.

No comments:

Post a Comment