मुंबई, दि. 29 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आणि पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त 2 ऑक्टोबर रोजी जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे ग्रामीण महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील फैजपूर येथे सकाळी 10 वा. हे आरोग्य शिबीर सुरु होणार आहे. प्रथमच होणाऱ्या या ग्रामीण महाआरोग्य शिबीरात नेत्ररोग, हृदयरोग, मेंदूरोग, जनरल शस्त्रक्रिया, बालरोग, मुत्ररोग, त्वचा रोग, स्त्रीरोग, मनोविकार, श्वसन विकार, ग्रंथीचे विकार, कर्करोग आदी आजारांची तपासणी करुन उपचार करण्यात येणार आहेत. अनेक नामवंत तज्ज्ञ डॉक्टर सामाजिक बांधिलकीतून आपल्या सेवा विनामुल्य या महाआरोग्य शिबीरात उपलब्ध करुन देणार आहेत. तसेच अत्याधुनिक वैद्यकीय सेवा ही या शिबीरात उपलब्ध केल्या आहेत.
००००
No comments:
Post a Comment