मुंबई, दि. २८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांची 'महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची यशस्वी वाटचाल' या विषयावर मुलाखत प्रसारित होणार आहे.
ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.३० ते ८ या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.
दिनांक १ ऑक्टोबर २०१७ रोजी सुरू होणारी शिर्डी विमानसेवा, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची ध्येय धोरणे, केंद्र व राज्य सरकार यांच्या समन्वयाने सुरू असलेली रिजनल कनेक्टीव्हीटी स्कीम, आगामी कालावधीतील उपक्रमांबाबत सविस्तर माहिती 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात श्री. काकाणी यांनी दिली आहे.
००००
No comments:
Post a Comment