मुंबई, दि. 30 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन,अल्पसंख्याक विकास आणि वक्फ राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची 'कृतिशिल सामाजिक न्याय' या विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि. 1 डिसेंबर 2017 रोजी सायंकाळी 7.30 ते 8.00 या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदिका मनाली दीक्षित यांनी घेतली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दिनांक 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर लाखो अनुयायी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यासाठी येतात,या दिनानिमित्त प्रशासनाची भूमिका, महामानव डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथे उभारण्यात येणारे स्मारक,सामाजिक न्याय विभागाच्या योजना, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या ‘स्वाधार’ योजनेबाबतची माहिती श्री. कांबळे यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.
००००
No comments:
Post a Comment