छत्रपती
शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
- उर्वरित
शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू
बुलडाणा, दि. 12 : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थातच
ऐतिहासिक कर्जमाफी योजनेतंर्गत जिल्ह्यातील 2 लक्ष 22 हजार 309 शेतकरी
कर्जमाफीसाठी पात्र आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर प्राप्त
याद्यांची छाननी करण्यात आली. छाननीनंतर पात्र शेतकऱ्यांच्या ग्रीन याद्या बँकांना
पाठविण्यात आल्या. या ग्रीन यादीत जिल्ह्यामध्ये 2 लक्ष 22 हजार 309 शेतकरी पात्र
असून यामधील 1 लाख 80 हजार 786
शेतकऱ्यांना सरसकट दीड लाखापर्यंतची कर्जमाफी देण्यात आली आहे. तसेच (ओटीएस) एकरकमी योजनेतंर्गत 41 हजार 518 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे. अशाप्रकारे
एकरकमी व सरसकट कर्जमाफी याप्रमाणे जिल्ह्यात 2 लक्ष 22 हजार 309 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत. त्याचप्रमाणे
जिल्ह्यात प्रोत्साहनपर अनुदानही देण्यात आले आहे.
या योजनेतंर्गत आतापर्यंत राज्यात साधारणत: 41 लाख
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 19 हजार कोटी रुपयांची रक्कम
बँकांकडे वर्ग करण्यात आले आहे. कर्जमाफीसाठी 77 लाख अर्ज राज्यभरातून
प्राप्त झाले. प्राप्त अर्जांची छाननी
करण्यात आली. त्यानंतर डुप्लिकेशन झालेले
खाते दूर करुन 69 लाख खात्यांवर कर्जमाफीची रक्कम जमा
करण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यापैकी जवळपास 41 लाख
खात्यांमध्ये कर्जमाफीचे अनुदान देण्यासाठी राज्य शासनाकडून बँकांकडे सुमारे 19
हजार कोटी रुपये इतका निधी हस्तांतरित
करण्यात आला आहे.
दीड लक्ष रूपयांपर्यंत सरसकट कर्ज माफ करण्यात आले, तर दीड लाखावरील कर्ज
असलेल्या शेतकऱ्यांना ‘वन टाईम सेटलमेंट’ अंतर्गत दीड लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ दिल्या जात आहे. शेतक-यांना दिलासा देण्यासाठी
राज्य शासनाने शेतजमिनीची अट न ठेवता कर्जमाफी योजना जाहीर केली. जिल्ह्यातील दीड लाख पर्यंतचे थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे खाते ‘निल’ करण्यात आलेले आहे.
याविषयी प्रतिक्रिया देताना बुलडाणा
तालुक्यातील रूईखेड टेकाळचे नारायणराव देशमुख म्हणतात, मी एक अल्पभूधारक शेतकरी
आहे. माझ्यावर बुलडाणा केंद्रीय सहकारी बँकेचे 17 हजार 200 रूपयांचे कर्ज थकीत होते.
मात्र या शासनाने कर्जमाफी दिली. माझे संपूर्ण कर्ज माफ झाले असून तसा एसएमएसही
मला आला आहे. याबद्दल राज्य शासनाचा मी आभारी आहे. तर भादोला ता. बुलडाणा येथील
शेतकरी अनिल भालेराव यांनी सांगितले, माझ्याकडे बुलडाणा सहकारी बँकेचे 77 हजार
रूपयांचे कर्ज थकीत होते. राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान
योजना जाहीर केली आणि आम्हाला कर्जमाफी मिळाली. माझे संपूर्ण कर्ज माफ झाले असून
मी पुन्हा नव्या उमेदीने शेती करण्यासाठी सज्ज आहे. शासनाने दिलेल्या कर्जमाफीमुळे
आम्हा शेतकऱ्यांना निश्चितच मोठा लाभ मिळाला आहे.
तसेच रुईखेड ता. बुलडाणा येथील श्रीधर
टेकाळे म्हणाले, बँकेचे माझ्याकडे 1 लाख 20 हजार 243 रूपयांचे कर्ज थकीत होते. या
कर्जापायी झोपही लागत नव्हती. मात्र राज्य शासन देवासारखे धावून आले आणि कर्जमाफी
दिली. माझे कर्ज माफ झाले असून यासाठी शासनाचे शतश: आभार मानतो. कर्जमाफीवर
प्रतिक्रीया देताना इसापूर येथील शेतकरी काशीराम निकम म्हणाले, माझ्यावर 1 लक्ष 59 हजार 600 रूपयांचे
कर्ज होते. शासनाने ही कर्जमाफी देवून नवसंजीवनी दिली. अनेक शेतकऱ्यांसह या
कर्जमाफीमुळे मी सुद्धा कर्जमुक्तीकडे वळलो आहे. शेतात अधिक उत्पादन घेवून आर्थिक
संपन्न होण्यासाठी प्रयत्नरत राहणार आहे. ही उर्मी केवळ या शासनाने दिलेल्या
कर्जमाफीमुळेच मिळाली एवढे मात्र निश्चित.
0000000
No comments:
Post a Comment