Tuesday, 30 January 2018

मंत्रिमंडळ बैठक : दि.30 जानेवारी 2018:आरोग्य विभागासह सर्व विभागांच्या औषधांची खरेदी “हाफकिन”मार्फतच


            सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागासह राज्य शासनाच्या अखत्यारितील सर्वच विभागांनी औषधीतत्सम वस्तु आणि वैद्यकीय उपकरणांची खरेदी ही हाफकिन बायो-फार्मास्युटिकल्स् कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फतच करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने यापूर्वी प्रसारित केलेल्या आदेशामध्ये या आशयाची सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
            या निर्णयामुळे औषधी व वैद्यकीय उपकरणांचे दर आणि मानके यामध्ये एकसूत्रता राहून दर्जा व गुणवत्ता आणखी सुधारण्यास मदत होईल. एकत्रित खरेदीमुळे शासनाच्या खर्चातदेखील बचत होणार आहे.
            सार्वजनिक आरोग्य विभागाने 26 जुलै 2017 रोजी शासन निर्णय प्रसारित केला होता. या निर्णयानुसार सार्वजनिक आरोग्य विभागवैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग व शासनाचे अन्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य संस्थांसाठी लागणाऱ्या औषधेतद्अनुषंगिक उपभोग्य वस्तू व वैद्यकीय उपकरणांची खरेदी हाफकिनकडून करणे बंधनकारक करण्यात आले होते.

            या आदेशात सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. सार्वजनिक आरोग्यवैद्यकीय शिक्षणमहिला व बाल विकाससामाजिक न्याय व विशेष सहाय्यगृहआदिवासी विकास विभागासह जिल्हा परिषदा व इतर विभाग यांना लागणारी औषधेतद्अनुषंगिक उपभोग्य वस्तू व वैद्यकीय उपकरणे आदी बाबींसाठी या विभागांना राज्य शासनामार्फत निधी उपलब्ध करुन देण्यात येत असतो. त्यामुळे सर्व विभागांनी हाफकिनमार्फत औषधेतद्अनुषंगिक उपभोग्य वस्तू व वैद्यकीय उपकरणे यांची खरेदी करणे बंधनकारक राहील.
-----0-----

No comments:

Post a Comment