वृ.वि. 578
मुंबई, दि. 28 : मे.पॅनकार्ड क्लब या कंपनीकडे गुंतवणूक केलेल्या सर्व गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. तसेच या कंपनीच्या आर्थिक गैरव्यवहारात जबाबदार असणाऱ्यांना अटक करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
मे.पॅनकार्ड क्लब या कंपनीकडे गुंतवणूक दारांच्या अडकून पडलेल्या पैशांसंदर्भात विधान परिषद सदस्य सतेज पाटील यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, मे.पॅनकार्ड क्लब या कंपनीकडे गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. अशा गुंतवणूकदारांना कंपनीची मालमत्ता विकून त्यांचे पैसे देण्यात येतील. गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील एक गुन्हेगार मयत झाला आहे. इतर गुन्हेगारांना अटक करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य जयंत पाटील यांनी सहभाग घेतला होता.
000
No comments:
Post a Comment