मुंबई, दि. 29 : मुंबईतील म्हाडा वसाहत गृहनिर्माण संस्थामधील रहिवाशांच्या थकित भुईभाडे, अकृषीकर आणि सेवाकराबाबत निर्णय घेण्यासाठी विधिमंडळ सदस्यांची समिती शासनाने स्थापन केली आहे.
विधिमंडळ गठित समितीमध्ये गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता हे अध्यक्ष आहेत. तर सदस्यांमध्ये गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर, महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर,सदस्य सर्वश्री अमित साटम, आशिष शेलार, सुनील राऊत, सुनील प्रभू, पराग अळवणी, मंगेश कुडाळकर, अस्लम शेख, भाई गिरकर, अनिल परब, भाई जगताप, किरण पावसकर, सदस्य सचिव म्हणून अपर मुख्य सचिव आणि निमंत्रित सदस्य म्हणून म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश आहे.
ही समिती रहिवाशांच्या प्रश्नासंदर्भात माहिती घेऊन एका महिन्याच्या आत शासनास अहवाल सादर करणार आहे. हा शासन निर्णयwww.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक 201803271734194009 असा आहे.
000
No comments:
Post a Comment