नागपूर जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम नागपूर, दि.4 : जिल्हे नागपूर याअंतर्गत जिल्हयातील ऐतिहासिक वास्तू, संस्कृती, पर्यटन तसेच विकास या विषयावर जिल्हा माहिती कार्यालयाच्या छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका दिनांक 17 एप्रिलपर्यंत स्वीकारण्यात येणार आहे. स्पर्धेत उत्कृष्ठ ठरणाऱ्या तीन प्रवेशिकांना पारितोषिक देवून गौरविण्यात येणार आहे.
जिल्हे नागपूर याअंतर्गत नागपूर जिल्हयातील ऐतिहासिक इमारती व मंदीर, स्मारके, सण व उत्सव, नागपूरची परंपरा, पर्यटन स्थळे, तसेच पायाभूत विकास हा छायाचित्र स्पर्धेचा विषय असून या स्पर्धेसाठी जिल्हा माहिती अधिकारी, नागपूर यांच्या ईमेल dionagpur@gmail.com या पत्त्यावर प्रवेशिका 17 एप्रिलपर्यंत स्वीकारण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी छायाचित्रकारांकडून मूळ स्वरुपाचे छायाचित्र 20 X 30 इंच जेपीजी फॉरमॅटमध्ये 300 डीपीआय मध्ये ईमेलवर पाठविणे आवश्यक आहे. ही स्पर्धा प्रेस फोटोग्राफरसह सर्व छायाचित्रकारांसाठी खुली असून नागपूर जिल्हयातील केवळ विषयासंदर्भातील छायाचित्रे स्वीकारण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी मूळ छायाचित्र पाठविणे आवश्यक आहे. छायाचित्रासोबत छायाचित्राचे ठिकाण व थोडक्यात माहिती तसेच छायाचित्रकाराचे नावही पीडीएफमध्ये पाठवावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी केले आहे.
जागतिक छायाचित्र दिनानिमित्त नागपूर जिल्हयातील इतिहास, परंपरा आणि पायाभूत विकास यावर आधारित छायाचित्र स्पर्धा माहिती व जनसंपर्क महासंचालनालय तसेच ऑरेंज सीटी फोटोग्राफर कल्ब व वृत्तपत्र छायाचित्रकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेमध्ये प्राप्त होणाऱ्या छायाचित्रांमध्ये विजयी स्पर्धकांना प्रथम पारितोषिक 11 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक 7 हजार रुपये व तृतीय पारितोषिक 4 हजार व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क नसून प्रवेशिका पाठविताना स्पर्धेसाठी पाठविण्यात येत असलेल्या छायाचित्रासंदर्भातील ऐतिहासिक माहिती, पार्श्वभूमी, छायाचित्राचे ठिकाण आदी माहिती टेक्स फाईलमध्ये पीडीएफ स्वरुपात पाठविणे आवश्यक आहे.
स्पर्धकांनी संपूर्ण नाव पत्ता तसेच दूरध्वनी क्रमांक ऑनलाईन पाठविणे आवश्यक आहे. स्पर्धेमध्ये प्राप्त झालेल्या प्रवेशिकातील उत्कृष्ठ छायाचित्राची निवड समितीमार्फत करण्यात येईल. स्पर्धेसाठीच्या अधिक माहिती साठी जिल्हा माहिती अधिकारी, प्रशासकीय भवन क्रमांक 1, तिसरा माळा, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे, तसेच दूरध्वनी क्रमांक 9890157788 व 0712-2561979 यावरही संपर्क साधता येईल.
00000000
No comments:
Post a Comment