मुंबई, दि. 3 : दौंडमध्ये अद्ययावत नाट्यगृह व क्रीडा संकुलासाठी दहा एकर
जागा देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले.
दौंडमध्ये नाट्यगृह व क्रीडासंकुलासाठी नगरपरिषदेला जागा देण्यासंदर्भात
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी
अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट, दौंडचे आमदार राहुल कूल, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजयकुमार, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव, कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, माजी नगराध्यक्ष श्री. कटारिया आदी यावेळी उपस्थित
होते.
दौंडमध्ये अद्ययावत सुविधा असलेले नाट्यगृह तसेच क्रीडा संकुल उभारण्यासाठी
दहा एकर जागा देण्यासंदर्भात तातडीने प्रस्ताव तयार करून पाठविण्याचे निर्देश
मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
००००
No comments:
Post a Comment