मुंबई, दि. 31 : महाराष्ट्र विधानपरिषदेतील नाशिक विभागातील एका शिक्षक मतदार संघातून, कोकण विभागातील एका शिक्षक मतदार संघातून व 2 पदवीधर मतदार संघातून निवडून आलेल्या सदस्यांच्या सदस्यत्वाची मुदत दिनांक 7 जुलै 2018 रोजी संपत असल्याने ते निवृत्त होणार आहेत. या रिक्त होणाऱ्या जागांसाठी भारत निवडणूक आयोगाने दिनांक 24 मे 2018 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून दिनांक 28 जून, 2018 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होण्याचा दिनांक 2 जुलै, 2018 आहे. या निवडणुकीसंदर्भात तक्रार दाखल करण्याकरिता मंत्रालयात 24 तास नियंत्रण कक्ष प्रस्थापित करण्यात आला आहे.
या निवडणूकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून म्हणजेच 31 जून, 2018 ते 2 जुलै, 2018 पर्यंत कक्ष क्र. 611, निवडणूक शाखा, सामान्य प्रशासन विभाग, 6 वा मजला, मंत्रालय विस्तार इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-32, येथे ‘नियंत्रण कक्ष’ 24x7 तत्वावर स्थापन करण्यात आला आहे. निवडणुकीसंदर्भात तक्रार दाखल करावयाची असल्यास नियंत्रण कक्षात दूरध्वनी क्र.022-22026441, मोबाईल क्र.9619204746 या क्रमांकावर तक्रार करावी, असे उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.
००००
No comments:
Post a Comment