नागपूर, दि.
3 :
गोव्यातील लोक विश्वास प्रतिष्ठानच्या नारायण आठवले पुरस्काराचे मानकरी लोकमत दैनिकाचे निवासी
संपादक गजानन जानभोर यांचा आज विभागीय अधिस्वीकृती समितीच्या बैठकीत सत्कार करण्यात आला.
श्री.
जानभोर यांना नुकत्याच एका समारंभात नारायण आठवले पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नागपूर
विभागीय अधिस्वीकृती समितीच्या आजच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री. चेतन भैरम हे होते. त्यांच्या हस्ते
हा सत्कार करण्यात आला.
यावेळी
विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य बंडू लडके, संचालक राधाकृष्ण मुळी, जिल्हा
माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, अनिल गडेकर, रवि गिते, विवेक खडसे, प्रवीण टाके,
सहाय्यक संचालक जगन्नाथ पाटील उपस्थित होते.
हा
पुरस्कार संस्थेच्या सामाजिक कार्यासाठी
दिला जातो. लोकविश्वास प्रतिष्ठान ही संस्था मागील 37 वर्षांपासून दिव्यांग
मुलांसाठी काम करत आहे. 14 शाळांच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे 500 दिव्यांग
मुलांच्या पुनर्वसनाचे कार्य या संस्थेमार्फत सुरु आहे. पत्रकारीतेच्या माध्यमातून
समाज कल्याणासाठी ज्या पत्रकारांनी आपल्या लेखणीतून समाज प्रबोधनासाठी योगदान दिले
त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते.
श्री.
जानभोर यांना मिळालेल्या 15 हजार पुरस्काराच्या रकमेत त्यांनी वैयक्तिक 6 हजार
योगदान देवून एकूण 21 हजार संस्थेच्या कार्यासाठी देणगी दिली आहे.
****
No comments:
Post a Comment