नागपूर दि. 31, संचालक
माहिती कार्यालय येथील वाहनचालक नामदेव नागपूरे हे आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त
झाले. त्यांना आज संचालक माहिती कार्यालयाच्या वतीने स्नेहपूर्वक निरोप देण्यात आला.
यावेळी संचालक राधाकृष्ण मुळी यांनी त्यांचा सपत्नीक
शाल, श्रीफळ, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी
अनिल गडेकर, विभागीय माहिती केंद्राचे जिल्हा माहिती अधिकारी केशव करंदीकर, सहायक संचालक श्रीमती
शैलजा दांदळे-वाघ उपस्थित होते.
यावेळी
संचालक राधाकृष्ण मुळी यांनी, नामदेव नागपूरे यांची 38 वर्षे शासन सेवेत गेली. हा कालावधी खूप मोठा आहे.
शासकीय नोकरी करताना वाहनचालक म्हणून पाळावयाच्या
वेळा या अत्यंत महत्त्वाच्या असतात आणि त्या नागपूरे यांनी अत्यंत काटेकोरपणे पाळल्या. सेवानिवृत्ती
जवळ आली असताना नागपुरातील यंदाचे पावसाळी अधिवेशन सुरु असतानाही त्यांनी पूर्ण सेवा
दिली. यातून त्यांची कामाप्रतीची निष्ठा लक्षात येते, असे सांगितले. तसेच त्यांच्या
भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी
जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, जिल्हा माहिती अधिकारी केशव करंदीकर आणि सहायक संचालक
श्रीमती शैलजा दांदळे-वाघ यांचीही समयोचित भाषणे झाली.
कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन श्रीमती अपर्णा यावलकर यांनी केले. यावेळी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी
मोठ्या संख्येंने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment