नगर विकास विभाग (1)
उमरेड (जि. नागपूर) येथील सर्व्हे क्रमांक 510/1 वरील क्रीडा संकुलासाठीचे आरक्षण वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
उमरेड येथील सर्व्हे क्रमांक 510/1 मधील 3.08 हेक्टर क्षेत्र क्रीडा संकुलासाठी आरक्षित ठेवण्यात आले होते. परंतु, हे क्षेत्र समपातळीवर नसून महामार्गावर असल्याने तालुका क्रीडा संकुलासाठी ही जागा योग्य नव्हती. त्यामुळे तालुका क्रीडा संकुलासाठी सर्व्हे क्रमांक 347 मधील जागा देण्यात आली असून तेथे बांधकामही सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे तेथे क्रीडा संकुलासाठी जाहीर करण्यात आलेले आरक्षण वगळण्याची मागणी होती. त्यानुसार आजचा निर्णय घेण्यात आला.
-----०-----
No comments:
Post a Comment