Monday, 30 July 2018

‘आपलं मंत्रालय’चा भ्रमंती विशेषांक प्रकाशित

मुंबई30 : आपलं मंत्रालय मासिकाच्या जुलैच्या "भ्रमंती" विशेषांकाचे प्रकाशन अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी संचालक (प्रशासन) अजय अंबेकरशिवाजी मानकर (माहिती व वृत्त/जनसंपर्क)संपादक सुरेश वांदिलेकार्यकारी संपादक मीनल जोगळेकरविभागीय संपर्क अधिकारी वर्षा फडके उपस्थित होते. या विशेषांकाचे अतिथी संपादक श्री. कुंटे आहेत. प्रकाशन समारंभावेळी श्री. कुंटे म्हणाले, ‘भ्रमंती विशेषांक उत्कृष्ट झाला आहे.
भ्रमंती विशेषांकात भंडारदरा धबधबानिघोज येथील रांजणखळगेशिवनेरीसिक्कीमलेह-लडाख या पर्यटन ठिकाणांच्या प्रवास वर्णनांचा समावेश आहे. त्याचबरोबर वृक्ष लागवडीचे आध्यात्मिक महत्त्व विशद करणारा लेखविनोदकविताशुभवर्तमानमंत्रालय परिसरातील घडामोडींचा यात समावेश करण्यात आला आहे.
0000

No comments:

Post a Comment