मुंबई, दि. 31 : माहिती
व जनसंपर्क महासंचालनालय आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त
विद्यमाने ‘फेक न्यूज परिणाम आणि दक्षता’ या विषयावर उद्या दि. 1 ऑगस्ट रोजी पत्रकारांसाठी
मंत्रालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
सायबर सेलचे पोलीस
अधीक्षक बालसिंग राजपूत हे याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. मंत्रालयातील वार्ताहर
संघाच्या कक्षात दु. 3 वा. या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेस उपस्थित
रहावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (वृत्त/जनसंपर्क)
शिवाजी मानकर यांनी केले आहे.
००००
No comments:
Post a Comment