Thursday, 30 August 2018

सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्यावतीने केरळ पुरग्रस्तांसाठी एक कोटीची मदत मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द



मुंबई, दि. 30 : मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास यांच्यावतीने केरळ राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक कोटी रुपयांच्या आर्थिक सहायाचा धनादेश मंदिरांच्या विश्वस्त मंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे सुपूर्द केला.
यावेळी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, कोषाध्यक्ष सुमंत घैसास, विश्वस्त भरत परिख, महेश मुदलियार, आनंद राव, गोपाळ दळवी, संजय सावंत, श्रीमती विशाखा राऊत, सुबोध आचार्य, श्रीमती वैभवी चव्हाण आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या या सामाजिक बांधिलकीचे आणि केरळमधील पुरग्रस्तांप्रतीच्या सहृदयतेबाबत कौतूक केले. 
००००

No comments:

Post a Comment