मुंबई, दि. 29 : पद्मश्री पुरस्कार आणि वाद्य संगीतासाठी संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळालेले गोव्याचे ज्येष्ठ हार्मोनियम वादक पंडित तुळशीदास बोरकर यांच्या निधनाने संगीतातला एक स्वर निखळला असल्याची भावना सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली आहे.
श्री. तावडे आपल्या शोकसंदेशात म्हणतात, संवादिनी वादन करणारे पंडित बोरकर यांनी ‘संवादिनी’प्रति असलेली आपली निष्ठा शेवटपर्यंत सोडली नाही, उलट संवादिनीवादनाचे विशेष कार्यक्रम त्यांनी केले. जिद्द, परिश्रम, आई-वडिलांचा आशीर्वाद आणि नवदुर्गादेवीची कृपा यामुळे त्यांनी संवादिनीवादनात आपली स्वतंत्र नाममुद्रा उमटविली. अनेक संगीत नाटकांमधून पंडित बोरकर यांच्या ऑर्गनवादनाची जादू रसिक श्रोत्यांनी अनुभवली आणि ऐकली आहे. पंडित बोरकर यांनी संगीतसाथ केलेल्या नाटकांच्या प्रयोगांची एकूण संख्या जवळपास दहा हजार इतकी असून यावरुन पंडित बोरकर यांनी संगीत क्षेत्रात दिलेले योगदान दिसून येते. ऑर्गन व संवादिनी वाजविणाऱ्या पंडित बोरकर यांच्या निधनाने संगीतक्षेत्राचे फार मोठे नुकसान झाले आहे.
००००
No comments:
Post a Comment