सुधीर मुनगंटीवार यांचा सदस्य म्हणून समावेश
मुंबई दि. 29 : नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी
निधी उभारणीच्या पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर परिषदेने
बिहारचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री सुशील कुमार मोदी यांच्या संयोजनाखाली
मंत्रीगटाची स्थापना केली असून यामध्ये महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.
काल वस्तू आणि सेवा कर परिषदेची ३० वी बैठक संपन्न झाली
या बैठकीत हा मंत्रिगट स्थापनण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचे अधिकृत पत्रक केंद्रीय वस्तू आणि सेवा कर परिषदेने दि.
२८ सप्टेंबर २०१८ रोजी निर्गमित केले आहे.
या मंत्रीगटात श्री. मुनगंटीवार यांच्याबरोबर
आसामचे वित्त मंत्री हेमंता बिस्व सर्मा, केरळचे वित्तमंत्री डॉ. टी.एम.थॉमस इसाक, ओडीसाचे अर्थमंत्री
शशीभूषण बेहरा,
पंजाबचे
अर्थमंत्री मनप्रीतसिंह बादल आणि उत्तराखंडचे अर्थमंत्री प्रकाश पंत यांची सदस्य
म्हणून नियुक्ती झाली आहे.
हा मंत्रिगट अनेक विषयाच्या अनुषंगाने अभ्यास
करील. यामध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण
निधीअंतर्गत राज्यांना आपत्ती निवारण आणि मदत कार्यासाठी देण्यात येणारा निधी
पुरेसा आहे किंवा कसे, वस्तू
आणि सेवाकराच्या माध्यमातून यासाठी काही पूरक पर्यायी व्यवस्था करण्याची गरज आहे
किंवा कशी,
असल्यास
ती कशास्वरूपात असावी, अतिरिक्त
कर असावा किंवा उपकर (सेस) लावावा, हा उपकर विशिष्टपणे राज्यासाठी लागू असावा किंवा देशभरात
त्याची अंमलबजावणी व्हावी, राज्यांना आपत्ती
निवारणासाठी मिळणाऱ्या निधीशिवाय अतिरिक्त निधी द्यावयाचा झाल्यास असा निधी
मिळण्यास पात्र होण्यासाठी उद्भवणाऱ्या
परिस्थिती कोणत्या असाव्यात, सध्याच्या वस्तू आणि सेवा कर कायद्यातील तरतूदीमधून ते
करणे (वस्तू आणि सेवा कर आपत्ती निवारण
निधी उभारणे) शक्य आहे का, किंवा नैसर्गिक आपत्ती
किंवा आपत्ती म्हणून पात्र ठरलेल्या विशिष्ट घटनेसाठी असा निधी उभारता येईल, याची संकलनाची पद्धत
काय असावी अशा विविध विषयांचा समावेश आहे. या सर्व विषयांवर अभ्यास करून हा
मंत्रीगट दि. ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी आपला अहवाल सादर करील असेही वस्तू आणि सेवा कर
परिषदेने निर्गमित केलेल्या मंत्रिगटाच्या स्थापनेच्या पत्रकात नमूद केले आहे.
००००
No comments:
Post a Comment