Tuesday, 30 October 2018

प्रमोद महाजन यांच्या जयंती दिनी जीवनपट उलगडविणाऱ्या रंगावली प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन


मुंबई, दि. ३० : माजी केंद्रीय मंत्री दिवंगत प्रमोद महाजन यांच्या ७० व्या जयंती दिनानिमित्त आयोजित रंगावली प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
चेतना महाविद्यालय, वांद्रे येथे आयोजित या कार्यक्रमास खासदार पूनम महाजन, आमदार पराग अळवणी, श्रीमती रेखा महाजन आदी उपस्थित होते.
या प्रदर्शनात दिवंगत महाजन यांचा जीवनपट उलगडणाऱ्या रंगावल्यांचा समावेश आहे. या प्रदर्शनाची पाहणी करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी कलाकृतींना दाद दिली. यावेळी घरोघरी संविधान पोहचविण्याच्या उपक्रमाचा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते संविधानाच्या प्रती वितरणाने प्रारंभही करण्यात आला.
'प्रमोदजी महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व होते. ते अष्टपैलू स्वरुपाचे होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व उलगडून दाखविणाऱ्या या रंगावल्यांमुळे त्यांच्या आठवणी ताज्या झाल्या, अशा शब्दांत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिवंगत महाजन यांच्या स्मृतींना अभिवादन केले.
संविधान घरोघरी पोहचविण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.




No comments:

Post a Comment