Thursday, 1 November 2018

दिलखुलास मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजय बर्वे

मुंबई, दि. 1 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलास कार्यक्रमात दक्षता जनजागृती सप्ताह या विषयावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शुक्रवार दि.2 आणि शनिवार दि.3 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. पत्रकार सुरेश ठमके यांनी ही मुलाखत घेतली आहे.
दि.29 ऑक्टोबर ते दि.3 नोव्हेंबर या काळात राबविण्यात येणाऱ्या दक्षता जनजागृती सप्ताहाचे उद्देश्य, लाचलुचपत विभागाची कार्यपद्धती, भ्रष्टाचारावर आळा बसविण्यासाठी विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना, भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याची शिक्षा, लोकजनजागृती, भ्रष्टाचाराचे दूरगामी  दुष्परिणाम, लाचलुचपत विभागात समाविष्ट होण्यासाठी तरूणांना मार्गदर्शन तसेच भ्रष्टाचाराची तक्रार करण्याकरिता संपर्क क्रमांकाची माहिती श्री. बर्वे यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.
००००

No comments:

Post a Comment