मुंबई, दि. 30 : मौजे अंजरुण ता. खालापूर जि. रायगड येथील गट क्र.53, 66 व 68 मधील बाधित शेतकऱ्यांना नवीन भूसंपादन कायद्यानुसार भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मदन येरावार यांनी विधान परिषदेत दिली.
याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य अनिकेत तटकरे यांनी मांडली होती. यावेळी श्री. येरावार बोलत होते.
यावेळी श्री. येरावार म्हणाले, मौजे अंजरुण ता. खालापूर येथील राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरी करणासाठी गट क्र. 53, 66 व 68 या मिळकतीतील जमिनी मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाद्वारे संपादित करण्यात आल्या आहेत. या भूसंपादनाच्या अनुषंगाने प्राप्त तक्रारीवर मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकारणाकडून कार्यवाही सुरु आहे.
या वेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सहभाग घेतला.
000
No comments:
Post a Comment