मुंबई, दि. 1 : माध्यमिक व उच्च माध्यमिक
परिक्षा मंडळाच्या इयत्ता 10 वी व 12 वी च्या परीक्षेत राज्यातून व विभागीय
परीक्षा मंडळातून सर्वप्रथम येणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गांच्या
गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थींनींना देण्यात येणाऱ्या 2017-18 या वर्षीच्या
"स्व. वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्काराचे वितरण शनिवार, दि. 3 नोव्हेंबर 2018 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागाचे मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते
होणार आहे.
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात सकाळी 11.00 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात
विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागाचे
राज्यमंत्री मदन येरावार, विभागाचे सचिव जे. पी. गुप्ता,
विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व
विशेष मागास प्रवर्ग संचालनालयाचे संचालक शरद अहिरे आदी यावेळी उपस्थित राहणार
आहेत. या कार्यक्रमात इयत्ता दहावीमध्ये विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातून
राज्यात सर्व प्रथम आलेले 3 विद्यार्थी,
विभागीय परीक्षा मंडळातून सर्वप्रथम आलेले 22 विद्यार्थी,
इयत्ता 12 वीच्या परीक्षेत विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातून
राज्यात सर्व प्रथम आलेल्या दोन तर विभागीय मंडळात प्रथम आलेल्या 17 अशा एकूण 44
विद्यार्थ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. राज्यात प्रथम आलेल्या
विद्यार्थ्यास प्रत्येकी एक लाख रुपये, स्मृती चिन्ह व
प्रमाण पत्र तर विभागीय पातळीवर प्रथम आलेल्या विद्यार्थ्यास प्रत्येकी 51 हजार,
स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
००००
No comments:
Post a Comment