Thursday, 29 November 2018

विधानपरिषद इतर कामकाज : मुंबई विद्यापीठांच्या उपकेंद्रांचे सक्षमीकरण करण्यात येईल - रवींद्र वायकर

मुंबईदि. २९ : मुंबई विद्यापीठांतर्गत कार्यरत असणा-या उपकेंद्रांचे सक्षमीकरण करण्यात येईल. यासाठी सोयीसुविधावित्तीय तरतूद करण्यात येणार असल्याचे उच्च आणि शिक्षण मंत्री रवींद्र वायकर यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले.
सदस्य निरंजन डावखरे यांनी मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनावर असणारा ताण याविषयावरील लक्षवेधी विधानपरिषदेत मांडली होती. यावर उत्तर देताना श्री. वायकर बोलत होते. मुंबई विद्यापीठाची स्थापना १८५७ मध्ये झाली असून मुंबई विद्यापीठाने १६१ वर्षात भरीव कामगिरी करीत आंतररराष्ट्रीय स्तरावर नावलैाकीक मिळविला आहे. विद्यापीठात सात लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मुंबई विद्यापीठाचे रत्नागिरी आणि ठाणे येथे उपकेंद्र असून या शैक्षणिक वर्षापासून कल्याण येथे उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आलेले असून ही केंद्रे अधिक कार्यक्षम करण्यात येतीलअसे श्री. वायकर यांनी सांगितले.
            विद्यापीठात शिकणा-या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज,परीक्षा फॅार्महॅाल तिकीटगुण पत्रिकापुनर्मुल्याकनाचे अर्जफोटोकॅापीचे अर्जदीक्षांत प्रमाणपत्र या सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या जातात. पात्रता प्रमाणपत्राची सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे श्री. वायकर पुढे म्हणाले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य श्रीमती मनीषा कायंदेश्रीमती विद्या चव्हाणसदस्य सर्वश्री हेमंत टकलेकिरण पावसकरविक्रम काळेजयंत पाटीलसतीश चव्हाण यांनी भाग घेतला.
                                                                    ००००

No comments:

Post a Comment